टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 21 जानेवारीला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा अचूक हिशोब करत विजयी सलामी दिली आहे. भारताने अभिषेक शर्मा आणि रिंकु सिंह या जोडीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 239 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांसमोर 20 […]
Kishori Pednekar | राज ठाकरेंच्या ट्वीटवर किशोरी पेडणेकर यांचे भाष्य, म्हणाल्या; राजकारणात लवचिकता नक्की असावी पण…
राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने ट्विट करून भाष्य केलं होतं. भाष्य करताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या राजकारणाचे दाखलेही दिले. ‘आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही नसेल,’ असं सूचक ट्विट राज ठाकरेंनी केलं, ‘आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्त्व सहज फेकली जातात आणि […]
तर तू कसला बाप? सुनीता अहुजाने गोविंदाच्या जिव्हारी लागणारे शब्द का वापरले?
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा तिच्या खासगी आयुष्याविषयी बेधडकपणे व्यक्त होत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने पुन्हा एकदा गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं. वयाच्या 63 व्या वर्षी असं काही करणं शोभतं का, असा सवाल तिने केला. इतकंच नव्हे तर गोविंदाने त्याच्या मुलांना करिअर घडवण्यासाठी मदत केली नसल्याची तक्रार तिने बोलून दाखवली. तर […]
Dhirendra Krishna Shastri : ज्या दिवशी तिरंग्यामध्ये चंद्र येईल त्या दिवशी… धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांचं मोठं वक्तव्य
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांनी यूपी बांदा येथे आयोजित आरएसएसच्या शताब्दी वर्ष हिंदू सम्मेलनात तिखट आणि मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या संबोधनात त्यांनी जातीयवादावर निशाणा साधला. राष्ट्रवाद सर्वोच्च स्थानी हवा असं म्हटलं. “ज्या दिवशी तिरंग्यामध्ये चंद्र येईल त्या दिवशी शर्मा, वर्मा कोणी राहणार नाही. क्षत्रिय राहणार नाही, रविदास आणि तुलसीदास वाले सुद्धा […]
Tulsi Tree : तुळस म्हणजे महासंकट, चार चुकांमुळे मोठा अनर्थ; तुम्ही चुका करताय का?
हिंदू धर्मात तुळस खूपच पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला लक्ष्मी माता असते असे सांगितले जाते. मान्यतेनुसार तळशीचे रोप घरात ठेवल्यास सकारात्मक उर्जा संचारते. त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांतता नांदते. परंतु तुळशीचे झाड घरात ठेवताना अनेकजण काही चुका करतात. या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. काही जण तुळशीचे झाड […]
Penny Share: या छोटुरामची शेअर बाजारात डरकाळी; 5,000 टक्क्यांची भरारी, गुंतवणूकदारांची दूर झाली गरिबी
मल्टिबॅगर स्मॉल कॅप स्टॉक Mercury EV Tech च्या शेअरकडे शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांचे पुन्हा लक्ष वेधले गेले. शेअर बाजारात घसरण सुरू असताना या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. काही दिवसांपासून सुस्तावलेल्या या शेअरमध्ये उसळी आल्याने गुंतवणूकदारांना हायसं वाटलं. या शेअरने गेल्या काही दिवसात मोठी घसरण पाहिली. आज हा मल्टिबॅगर स्टॉक दिवसभराच्या व्यापारी सत्रात […]