• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

OTT Release : पावसाळ्यात विकेंड होईल खास, Netflix आणि Amazon Prime वर नुकताच प्रदर्शित झाल्यात 4 हिट सीरिज, पाहा लिस्ट

July 3, 2026 by admin Leave a Comment


OTT Release : सांगायचं झालं तर, प्रत्येक शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे प्रदर्शित होत असतात, पण या आठवड्यात गुरुवारी म्हणजे 2 जुलै रोजी मनोरंजनाचा मोठा धमाका होणार आहे. जर यंदाच्या विकेंडचा तुमचा काही प्लान नसेल तर, कुटुंबियांसोबत तुम्ही दमदार सिनेमे आणि सीरिजचा आनंद घेऊ शकता. Netflix आणि Amazon Prime वर काही  सीरिज प्रदर्शित होत आहेत. कॉमेडी, हॉरर, क्राईम थ्रिलर अशी मनोरंजनाची एकत्र मोजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तर जाणून घ्या अशा 4  सीरिज, ज्यामुळे तुमचा विकेंट आनंदी जाईल…

1. द ह्यूमन वेपर

स्टारकास्ट – शूम ओगुरी आणि यू आओई

दिग्दर्शक – शिंजो कातायामा

ओटीटी प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स

सीरिजबद्दल सांगायचं झालं तर, 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द ह्यमन वेपर’ सिनेमाचा रिमेक आहे सीरिजची कथा अशा व्यक्तीच्या भोवती फिरत आहे, जिच्याकडे संपूर्ण शरीर गॅसमध्य बदल्याची शक्त आहे… कथेमध्ये ट्विस्ट तेव्हा येतं जेव्हा, लाईव्ह शो दरम्यान, एक व्यक्ती स्वतःला गॅसमध्ये बदलते आणि दुसऱ्या व्यक्तीची हत्या करते… पण पोलिसांच्या ताब्यात येण्याआधीत तो पळून जातो आणि चेतावनी देतो की, अन्य लोकांचा देखील मृत्यू होणार आहे…

2. इसाकापटनम

स्टारकास्ट – समुथिराकानी आणि ऐश्वर्या राजकेश

दिग्दर्शक – गैरी बीएच

जॉनर – क्राईम थ्रिलर / ॲक्शन ड्रामा

ओटीटी – ॲमेझन प्राईम

‘इसाकापटनम’ दमदार तेलुगू क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. क्राईम थ्रिलर सीरिजची कथा नायडू याच्याभोवती फिरते, ज्याला शहरातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून दाखवण्यात आलं आहे. राजकारण, गुन्हेगारी आणि व्यापार अशा विविध क्षेत्रांत त्याचा प्रभाव पसरलेला आहे. हे शहर आपणच घडवलं आहे अशी नायडूची धारणा आहे आणि तो अत्यंत निर्दयीपणे त्यावर आपले वर्चस्व टिकवून ठेवतो. मात्र, त्याला सर्वात मोठं आव्हान एखाद्या प्रतिस्पर्धी टोळीकडून किंवा राजकीय विरोधकाकडून नाही, तर त्याच्या स्वतःच्याच कुटुंबाकडून मिळतं. या सीरिजमध्ये ऐश्वर्या राजेशने नायडूची मुलगी ‘भारती’ची भूमिका साकारली आहे.

3. सुपर सुब्बू

स्टाकास्ट – संदीप किशन, मिथिला पालकर आणि मुरली शर्मा

दिग्दर्शक – मल्लीका राम

जॉनर – कॉमेडी ड्रामा

ओटीटी – नेटफ्लिक्स

‘सुपर सुब्बू’ सीरिज ‘माकीपूर’ नावाच्या एका ग्रामीण गावाभोवती फिरते, जिथे सुब्बूला प्रौढांना गुप्तपणे सेक्स – एज्युकेश देण्याचं एक अनोखं काम मिळतं. पण असं काम अभिनेत्याला वडिलांपासून लपवावं लागतं आणि गावकऱ्यांसोबत जुळवून घ्यावं लागतं.

4. सर्व्हायकल ऑफ द थिकेस्ट सीझन 3

स्टारकास्ट – मिशेल ब्यूटो आणि अन्य सेलिब्रिटी

दिग्दर्शक – एमी एनियोबी, किम गुयेन, डॅनियल सांचेज

जॉनर – कॉमेडी ड्रामा

ओटीटी – नेटफ्लिक्स

मिशेल ब्यूटो यांच्या कॉमेडी ड्रामाचा तिसरा सीझन चाहत्यांच्या भेटस आला आहे. यामध्ये मुख्य भूमिका त्यांच्या करियर आणि नात्यांमध्ये येणारे चढ – उतार सांभाळताना दिसत आहेत. ज्यामध्ये ते आयुष्यात नवीन धडे गिरवताना दिसणार आहेत. मैत्री, आव्हाने आणि लाईफ लेसन्स या सीरिजमध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in