• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

OTTवर गाजतोय मराठी सिनेमा; ‘तुंबाड’सारखा थरार, क्लायमॅक्समध्ये मोठा ट्विस्ट!

August 21, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि लोककथांवर आधारित चित्रपटांची संख्या तुलनेनं कमी असली तरी अशा कथा प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देतात. सध्या असाच एक मराठी चित्रपट ओटीटीवर चर्चेत आला आहे. प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील लोककथा रहस्य खजिना आणि भय यांचा संगम दाखवते.

मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि लोककथांवर आधारित चित्रपटांची संख्या तुलनेनं कमी असली तरी अशा कथा प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देतात. सध्या असाच एक मराठी चित्रपट ओटीटीवर चर्चेत आला आहे. प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील लोककथा, रहस्य, खजिना आणि भय यांचा संगम दाखवते.

प्राइम व्हिडीओवर ट्रेंड होणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे 'घबाडकुंड'. याची कथा एका अशा रहस्यमय विहिरीभोवती फिरते जिच्याशी लपवलेल्या सोन्याची आणि एका भयावह शक्तीची आख्यायिका जोडलेली आहे. गावातील लोकांना या विहिरीत खजिना असल्याची माहिती असते. मात्र तो मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही जागा जीवघेणी ठरते. खजिन्याचं रक्षण करणाऱ्या अदृश्य शक्तीमुळे विहिरीचं गूढ आणखी गडद होत जातं.

प्राइम व्हिडीओवर ट्रेंड होणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे 'घबाडकुंड'. याची कथा एका अशा रहस्यमय विहिरीभोवती फिरते, जिच्याशी लपवलेल्या सोन्याची आणि एका भयावह शक्तीची आख्यायिका जोडलेली आहे. गावातील लोकांना या विहिरीत खजिना असल्याची माहिती असते. मात्र तो मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही जागा जीवघेणी ठरते. खजिन्याचं रक्षण करणाऱ्या अदृश्य शक्तीमुळे विहिरीचं गूढ आणखी गडद होत जातं.

या चित्रपटात दिलीप हा सामान्य परिस्थितीत जगणारा तरुण आहे. एका प्रसंगात तो योगायोगाने त्या रहस्यमय विहिरीपर्यंत पोहोचतो. तिथे त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू येतो आणि त्याच्यावर संकट ओढावतं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तो त्या विहिरीतून जिवंत बाहेर पडतो. या घटनेनंतर त्याच्या जन्माचं आणि त्या विहिरीच्या इतिहासाचं नातं उलगडायला सुरुवात होते.

या चित्रपटात दिलीप हा सामान्य परिस्थितीत जगणारा तरुण आहे. एका प्रसंगात तो योगायोगाने त्या रहस्यमय विहिरीपर्यंत पोहोचतो. तिथे त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू येतो आणि त्याच्यावर संकट ओढावतं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तो त्या विहिरीतून जिवंत बाहेर पडतो. या घटनेनंतर त्याच्या जन्माचं आणि त्या विहिरीच्या इतिहासाचं नातं उलगडायला सुरुवात होते.

दिलीप या गूढ खजिन्याचा वंशज असल्याचं समोर आल्यानंतर कथेला वेग येतो. दुसरीकडे खंगरी नावाचा तांत्रिकही या खजिन्यावर डोळा ठेवून असतो. पौर्णिमेच्या दिवशी विहिरीतील खजिना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यासाठी एका मुलीचा वापर करण्याचा कट रचला जातो आणि त्यानंतर घटनांना भयावह वळण मिळतं.

दिलीप या गूढ खजिन्याचा वंशज असल्याचं समोर आल्यानंतर कथेला वेग येतो. दुसरीकडे खंगरी नावाचा तांत्रिकही या खजिन्यावर डोळा ठेवून असतो. पौर्णिमेच्या दिवशी विहिरीतील खजिना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यासाठी एका मुलीचा वापर करण्याचा कट रचला जातो आणि त्यानंतर घटनांना भयावह वळण मिळतं.

प्रीतम एस. के पाटील दिग्दर्शित या चित्रपटात कुशल बद्रिके संदिप पाठक देवदत्त नागे शशांक शेंडे आणि स्मिता पायगुडे यांसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 19 जून 2026 रोजी प्रदर्शित झाला असून आयएमडीबीवर त्याला दहापैकी 7.5 रेटिंग मिळाली आहे.

प्रीतम एस. के पाटील दिग्दर्शित या चित्रपटात कुशल बद्रिके, संदिप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे आणि स्मिता पायगुडे यांसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 19 जून 2026 रोजी प्रदर्शित झाला असून आयएमडीबीवर त्याला दहापैकी 7.5 रेटिंग मिळाली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in