• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Operation Sindoor : पाकिस्तानला वाटलं आपण राफेल पाडतोय, पण..इंडियन एअरफोर्सने पाकड्यांना कसं मूर्ख बनवलं ते आता आलं समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काही फायटर जेट्स पाडल्याचा दावा केला होता. या विजयाचं त्यांनी सेलीब्रेशन सुद्धा केलं होतं. पण आता समोर आलेलं सत्य पाहिलं तर त्यांचे दावे किती खोटे होते, ते दिसून येतय. पाकिस्तान ज्या जेट्सना राफेल समजत होता, ते डिकॉय म्हणजे दिशाभूल करणारी टार्गेट्स निघाली आहेत. इंडियन एअरफोर्सच्या राफेलनचे उड्डाण केलं, त्यावेळी एक्स-गार्ड नावाची टोड डिकॉय सिस्टिम सक्रीय होती. ही इस्रायली फायबर ऑप्टिक सिस्टिम आहे. राफेलच्या स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूटचा भाग आहे. ही सिस्टिम खऱ्या विमानासारखचं काम करते. रडार गाइडेड मिसाइल्सना विमानापासून लांब ठेवते. एक्स-गार्ड सिस्टिमचं वजन 30 किलोग्रॅम आहे. ही सिस्टिम 500 वॉटचे 360 डिग्री जॅमिंग सिग्नल सोडते.

शत्रूचे रडार किंवा मिसाइल सिस्टिमला वाटतं की, हे खरं विमान आहे. जेव्हा, पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिम किंवा जेट टार्गेट्स लॉक करतात, तेव्हा ते या डिकॉय सिस्टिमला टार्गेट करतात. त्यावेळी खऱ्या राफेलच दुसरीकडे सुरक्षित उड्डाण सुरु असतं. ही सिस्टिम आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने सिग्नल सतत बदलत असते. जेणेकरुन शत्रूचे सेन्सर कन्फ्यूज व्हावेत.पाकिस्तानने जे टार्गेट्स हिट केल्याचा दावा केला, वास्तवात त्यांनी एक्स-गार्ड डिकॉय सिस्टिमला टार्गेट केलेलं. खरे राफेल्स पूर्णपणे सुरक्षित होते. पाकिस्तानच्या जे-10 सी फायटर विमानातील केएलजे-7ए AESA रडारने डिकॉय सिस्टिमला खरी विमानं समजण्याची चूक केली. जेन्स डिफेन्स वीकलच्या चौकशीतून हे सत्य समोर आलय.

शत्रुची महागडी मिसाइल्स वाया जातात

या रडारनी डिकॉयला लॉक केलं. मिसाइल्सना विमानाऐवजी डिकॉय सिस्टिमला हिट केलं. पाकिस्तानला वाटलं की, त्यांनी भारतीय फायटर जेट्स पाडली. पण वास्तवात त्यांची मिसाइल नकली टार्गेटला लागून नष्ट झाली. त्यानंतर पाकिस्तान स्वत:ची पाट थोपटून घेत होता. पण वास्तव काहीतर वेगळं होतं. एक्स-गार्ड सारख्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टिमने दाखवून दिलं की, आजच्या हवाई युद्धात फक्त मिसाइल आणि रडारच नाही, तर फसवणूक हे सुद्धा महत्वाचं तंत्र आहे. या सिस्टिममुळे विमानाचं आयुष्य वाढतं. शत्रुची महागडी मिसाइल्स वाया जातात. खरी जेट्स सुरक्षित राहतात.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in