• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले….

June 27, 2026 by admin Leave a Comment


धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी गटात जाण्याच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. सामान्य माणसाच्या समस्या सोडवणे आणि मतदारसंघाचा विकास करणे हीच माझी प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एका चर्चित विषयावरुन पर्दा उठवला आहे. त्यांनी मंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला आहे. “मी रोज सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या अडचणी खूप मोठ्या आहेत आणि त्या सोडवणे माझी जबाबदारी आहे,” असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य नागरिकांची कामे करणे हे माझे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्यजित जोड मिळाल्यामुळे आता आणखी चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सामान्य माणसाच्या कामातूनच मी माझ्यावर होणाऱ्या सर्व टीकेला उत्तर देईन,” असेही त्यांनी म्हटले.

केंद्रात राज्यमंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. धाराशिव जिल्हा मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत 3 क्रमांकावर असल्याने त्या भागाचा विकास करण्यासाठी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सत्तेच्या बाजूने आलो असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या परत या, शिवसेना आपलीच, खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भर सभेत साद!
  • फुटबॉलपटूची धाकधूक वाढली, व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपात पत्नी आणि मुलं बेपत्ता
  • मोठी बातमी! तर फडणवीस पंतप्रधान…, विमानातील भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा
  • सहा खासदारांचं नेतृत्व कुणी केलं? एकनाथ शिंदे नाहीच… उद्धव ठाकरेंनी घेतलं या नेत्याचं नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
  • TET पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM ना करणार मागणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in