• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Numerology 2026: 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान अंकांची साथ कशी असेल? गुरू ग्रहाचा असेल प्रभाव

August 1, 2026 by admin Leave a Comment


अंकशास्त्रात तुमचा मूलांक हा सर्वात महत्त्वाचा ठरतो. तुमचा जन्म महिन्याच्या कोणत्या तारखेला झाला यावरून मूलांक ठरतो. जर तुमची जन्मतारीख 5 असेल तर तुमचा मूलांक 5 असेल. तुमच्या जन्मतारखेत दोन अंक असेल तर त्यांची बेरीच करून आलेला अंक तुमचा मूलांक ठरतो. जसं की तुमची जन्मतारीख 12 असेल तर या दोन अंकाची बेरीज करून आलेला 3 हा तुमचा मूलांक असेल. जर जन्मतारीख 29 असेल तर या दोन अंकाची बेरीज 11 येईल आणि 11 अंकाची बेरीज ही 2 असेल. त्यामुळे या तारखेचा मूलांक हा 2 असेल. प्रत्येक मूलांकावर ग्रहांचा प्रभाव असतो. 1, 10, 19, 28 या अंकावर सूर्य ग्रह; 2, 11, 20, 29 या अंकावर चंद्र ग्रह; 3, 12, 21, 30 या अंकावर गुरू ग्रह; 4, 13, 22, 31 या अंकावर राहु ग्रह; 5, 14, 23 अंकावर बुध ग्रह; 6,15, 24 अंकावर शुक्र ग्रह; 7,16, 25 अंकावर केतू ग्रह; 8,17,26 अंकावर शनि ग्रह आणि 9, 18, 27 अंकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो.

3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्यावर कोणता ग्रहाचा अंमल?

पुढच्या आठवड्याची सुरूवात 3 तारखेपासून तर शेवट 9 ऑगस्टला होत आहे. या आठवड्यावर 3 या अंकाचा अंमल आहे. म्हणजेच गुरू ग्रहाचा प्रभाव या आठवड्यावर दिसणार आहे. गुरू ग्रह नवग्रहांमध्ये सर्वात शुभ, कल्याणकारी आणि विस्तार करणारा ग्रह मानला जातो. हा आठवडा शिक्षण, ज्ञान आणि आर्थिक प्रगतीसाठी उत्तम राहिल.

तुमचा मूलांक, भाग्य रंग आणि दिवस

मूलांक 1: या आठवड्यात नोकरीत नवीन जबाबदारी किंवा बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. शुभ रंग व दिवस: पिवळा; सोमवार

मूलांक 2: चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक चढ-उतार जाणवू शकतात. नोकरीत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. शुभ रंग व दिवस: पांढरा; बुधवार.

मूलांक 3: रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल.शुभ रंग व दिवस: केशरी; गुरुवार.

मूलांक 4: परदेशातून किंवा तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कामातून मोठा लाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.शुभ रंग व दिवस: निळा; शनिवार.

मूलांक 5: मीडिया, बँकिंग किंवा लेखनाशी जोडलेल्या लोकांना मोठे यश मिळेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शुभ रंग व दिवस: हिरवा; शुक्रवार.

मूलांक 6: कला आणि फॅशन क्षेत्रातील लोकांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. खरेदीवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.शुभ रंग व दिवस: गुलाबी; मंगळवार.

मूलांक 7: कामाच्या ठिकाणी शांत राहून काम करा. आर्थिक व्यवहारात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. शुभ रंग व दिवस: फिकट पिवळा; रविवार.

मूलांक 8: व्यावसायिक क्षेत्रात मोठे आणि दीर्घकालीन निर्णय घेण्यासाठी काळ उत्तम आहे. रिअल इस्टेटमध्ये लाभ होईल.शुभ रंग व दिवस: काळा किंवा जांभळा; शनिवार.

मूलांक 9: कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य नियोजन कराल. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग व दिवस: लाल; मंगळवार.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in