• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET Paper Leak Case : शिवराज मोटेगावकर याला आणखी मोठा दणका, अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा ?

May 22, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला नुकतीच सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात मोटेगावकर यांच्या मेडीकल कॉलेज किंवा शैक्षणिक संकुलासाठी लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेली इमारत बांधकाम परवाना न घेता अनधिकृत उभारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात मोटेगावकर याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोटेगावकर याना या प्रकरणात नोटिस बजावत या बांधकामाचा परवाना आणि इतर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

लाखो रुपयांची फी वसुल करत कोचिंग क्सासेसमध्ये साम्राज्य उभे करणारे शिवराज मोटेगावकर याला नीट पेपर फुट घोटाळ्यात सीबीआयने अटक केली आहे. मोटेगावकरने मेडीकल कॉलेज किंवा शैक्षणिक संकुलासाठी लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेली इमारत बांधकाम परवाना न घेता अनधिकृत उभारल्याचे समोर आले आहे. आज जिल्हा प्रशासनाने या मध्ये लक्ष घालत मोटेगावकरच्या अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मोटेगावकरला नोटीस बजावत तातडीने या बांधकामा बाबत बांधकाम परवाना आणि इतर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थी आणि पालक सीबीआयच्या रडारवर

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरचे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचे नाव उघड झाल्यानंतर त्यांच्या विरोधात विविध स्तरातून आंदोलने होत आहेत. लातूर येथील प्राध्यापक कुलकर्णी यांचा रोल पुढे आल्यानंतर मोटेगावकर यांना अटक झाली होती. मोटेगावर यांच्या RCC क्लासमधे शिकणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची देखील CBI कडून चौकशी केली जाते आहे. मोटेगावकर यांच्याकडून NEET चे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक सीबीआयच्या रडारवर आहेत. या प्रकरणात आजच पुणे येथून ११ आरोपी प्राध्यापिका मनिषा हवालदार यांना अटक करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in