• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NADA : नाडाची मोठी कारवाई, डोप टेस्ट प्रकरणात 2 खेळाडू दोषी, इतक्या वर्षांची बंदी

May 21, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. नाडा अर्थात नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या अपील पॅनेलने डिस्कस थ्रोअर बनवीर सिंह याला मोठा झटका दिला आहे. अपील पॅनेलने बनवीर सिंह याच्यावर डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंदीची कारवाई केली आहे. बनवीर याच्यावर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शिस्तपालन समितीने दिलेल्या शिक्षेपैकी ही शिक्षा 2 वर्षांपेक्षा जास्त आहे. शिस्तपालन समितीने यापूर्वी दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेपेक्षा दोन वर्षांनी अधिक आहे.

डोपिंग विरोधी समितीला बनवीर सिंह गेल्या वर्षी उत्तेजक द्रव्य घेतल्या प्रकरणी पॉझिटिव्ह सापडला होता. डोपिंग विरोधी समितीने बनवीरवर 23 डिसेंबर 2024 रोजी 5 वर्षांची बंदीची कारवाई केली होती. मात्र आता या समितीने बनवीरची शिक्षा 5 वरुन 7 वर्षांची केली आहे.

बनवीर सिंह याच्यावर आधीपासून 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बनवीरला वर्षभरात 3 वेळा राहत्या ठिकाणाची माहिती देण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही बनवीरने राहत्या ठिकाणाची माहिती दिली नव्हती. त्यामुळे बनवीर याच्यावर 22 डिसेंबरपर्यंत बंदी कायम होती. आता एडीएपीच्या नव्या निर्णयामुळे बनवीरवरील बंदीचा कालावधी 7 वर्ष इतका झाला आहे. मात्र नाडाकडून शिक्षा वाढवण्यामागील कारणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बनवीर सिंह सर्वात वयस्कर खेळाडू

बनवीर डोपिंग टेस्टमुळे बॅन होणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. बनवीरवर वयाच्या 37 व्या वर्षी ही कारवाई करण्यात आली. बनवीरला त्याच्या कारकीर्दीत काही खास करता आलं नाही. बनवीरने 2022 साली भुवनेश्वरमध्ये झालेल्या इंडियन ग्रँड प्री स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं होतं. मात्र बनवीरला त्या व्यतिरिक्त एकदाही कारकीर्दीत टॉप 3 मध्ये धडक देता आली नाही.

हरेंद्र कुमार याच्यावरही बंदी

दरम्यान बनवीर व्यतिरिक्त लाँग डिस्टेंस रनर हरेंद्र कुमार डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला . त्यामुळे हरेंद्र कुमार याच्यावर 2 ऑगस्टपासून 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याआधी हरेंद्र कुमार याच्यावर 2022 साली उत्तेजक द्रव्य घेतल्याने 4 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

बनवीर आणि हरेंद्र या दोघांमुळे भारतीय क्रीडा वर्तुळात डोपिंगचा प्रकार कायम असल्याचं स्पष्ट झालंय. नाडाकडून खेळाडूंना डोपिंगपासून दूर ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यानंतरही असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आणखी जागरुकतेची गरज असल्याचं म्हटलं जात आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
  • संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू
  • 6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in