
MPSC च्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला नंदुरबारमधून ताब्यात घेण्यात आलं. ऋतुजा हिला ताब्यात घेतल्यानंतर पेपरफुटी प्रकरणातील तपासाला वेग येणार आहे. ऋतुजा पाटील हिला नंदुरबारातील ज्ञानदीप सोसायटीमधील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे विशेष गुन्हे शाखेचे पथक आज सकाळपासून नंदुरबारमध्ये दाखल झालं होतं. पोलिसांच्या पथकाने नंदुरबारातील विविध ठिकाणी झाडाझडती घेत चौकशी केली. त्यानंतर अखेर ऋतुजा पाटील हिला तिच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं.
ताब्यात घेतल्यानंतर ऋतुजा पाटील हिला मुंबईतील विशेष गुन्हे शाखेच्या पथकाकडून मुंबईला नेण्यात येणार आहे. त्यांच्या ताब्यामुळे औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply