• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MLC Electon : नाशिकसोबत आता जळगावचा देखील प्रश्न सुटला, महाजन यांनी स्पष्ट केले…

June 11, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील १७ विधानपरिषदेच्या जागावर निवडणूक लागली आहे. यातील सहा जागांवर बिनविरोध निवडणूक करण्यात महायुतीला यश मिळत आहे आणि आता शिल्लक ११ जागांवर येत्या १८ जून रोजी निवडणूक होत आहे. नाशिक आणि जळगावात महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. नाशिक येथे भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे यांचे बंड शमवण्यास भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांना यश मिळाले होते. त्यामुळे तेथे आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यातच आता जळगावचा तिडा देखील संपल्याचे सुतोवाच मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

नाशिकमधील महायुतीची बंडखोरी क्षमवण्यास भाजपाला यश आले होते. मात्र, जळगावातही पेच कायम होता. जळगावात संख्याबळ भाजपाच्या पारड्यात असल्याने बिनधास्त असलेल्या भाजपाला महायुतील बंडखोरीचा फटका बसला होता. येथे भाजपाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटातील रेश्मा काळे यांनी येथे अपक्ष म्हणून बंडाचे निशाण फडकवले होते. मात्र, आता या संदर्भात गिरीश महाजन यांनी नाशिक बरोबरच जळगावमधील देखील बंडखोरी संदर्भातील प्रश्न सुटल्याचे सांगितले आहे.

जळगावमधील विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी मागे घेण्यासंदर्भात घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील असे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. जळगाव आणि नाशिक अशा दोघा जागांसदर्भातील महायुतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

सक्षम विरोधी पक्ष राज्यात शिल्लक राहिला पाहिजे

शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु असल्या संदर्भात विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की शुभेच्छा आहे त्यांना ! चांगलं आहे राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची अशी दोघांची टीम मिळून चांगलं काम करतील. सक्षम विरोधी पक्ष राज्यात शिल्लक राहिला पाहिजे, सध्या कोणी शिल्लक नाही. एकत्र येऊन पाहिलं, वेगवेगळ्या होऊन पाहिले. मात्र,काहीही होत नाहीए असेही ते म्हणाले. इंडिया आघाडीचा उल्लेख करत ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा चेहरा कोण ? असा प्रश्न विचारल्यावर त्यांच्यात भांडण सुरू झाली आहेत. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण ? हे सुद्धा कोणी सांगू शकत नाहीत.. सांगू शकणार नाहीत आणि सांगितले तर ते पुन्हा वेगवेगळे होतील असा दावा महाजन यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in