
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 69 व्या आणि प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय निर्णायक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर वानखेडे स्टेडियमध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर राजस्थानला 200 पार पोहचता आलं. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. त्यामुळे आता राजस्थान हा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट मिळवणार की मुंबई आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करणार? हे 20 ओव्हरनंतर स्पष्ट होईल. दोन्ही संघांचा हा 14 वा आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे.
17 व्यांदा 200+ रन्स चेज होणार?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत 16 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे बारीक लक्ष असणार आहे.
Leave a Reply