
Marriage Life : सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयु्ष्याची चर्चा रंगली आहे, त्या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, अभिनेत्री नीना गुप्ता आहे. नीना गुप्ता यांनी अनेकदा खासगी आयु्ष्याबद्दल सांगितलं आहे. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी पहिल्या लग्नाबद्दल आणि प्रेमाबद्दल मोठा खुलासा केला आहे. आज नीना गुप्ता त्यांच्या आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्या आयुष्यात मोठी संकटं आली होती. नीना यांच्या पहिल्या नवऱ्याचं नाव अमलान कुसुम घोष असं आहे. त्यांचं पहिलं लग्न एक वर्ष देखील टिकलं नाही.
पहिल्या प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल काय म्हणाल्या नीना गुप्ता…
नीना गुप्ता म्हणाल्या, ‘आयआयटीमध्ये काम करणाऱ्या एका मुलासोबत मी प्रेम केलं आणि त्याच्यासोबत लग्न देखील केलं. एकदा मी आणि माझ्या बॉयफ्रेंडने सिनेमा पाहण्याचं ठरवलं होतं. याबद्दल मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं होतं. तिने माझ्या आईला जाऊन सांगितलं, ‘तुमची मुलगी बॉयफ्रेंडसोबत सिनेमा पाहयला जाणार आहे.’ तेव्हा माझ्या आई – वडिलांना मला सिनेमा पाहण्यासाठी पाठवलं नाही.’
‘त्या काळात फोन नव्हते, त्यामुळे मी त्याला सांगू देखील शकले नाही की, मी येणार नाही…’, पुढे नीना प्रेमाबद्दल म्हणाल्या, ‘मी कधीच प्रेमात पडले नाही. सिनेमांमध्ये, पुस्तकांमध्ये मी ज्या प्रेमाबद्दल वाचलं आहे. तसं प्रेम मी खऱ्या आयुष्यात कधीच अनुभवलं नाही. माझ्यावर तसं प्रेम देखील कोणी केलं नाही. मी देखील प्रेम केलं नाही, अशा प्रेमासाठी समोरचा व्यक्तीदेखील तसा असणं गरजेचं आहे. माझ्यासाठी कधीच असं कोणी वेडं झालं नाही…’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
भावनीक संबंधांबद्दल नीना गुप्ता म्हणाल्या, ‘भावना कधीच कोणाकडे व्यक्त करायच्या नाहीत. मी मसाबा हिला देखील अनेकदा सांगते की, तुझ्या वैयक्तिक भावना तुझ्यापर्यंतच ठेव. त्याबद्दल कोणाशीही बोलू नकोस… स्वतःच्या भूतकाळाबद्दल देखील कोणाला सांगू नकोस. महत्त्वाचं आहे वर्तमान जगणं…’, असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या..
नीना गुप्ता – विवियन रिचर्ड्स
नीना गुप्ता – विवियन रिचर्ड्स यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. विवाहित असल्याने विवियन रिचर्ड्स यांनी कायम त्यांच्या कुटुंबाला महत्त्व दिलं. अशात प्रेग्नंट असल्याचं समजल्यावर त्यांनी विवियन यांना कॉल केला आणि त्याबद्दलची माहिती दिली. विवियन यांचा नकार असेल तर त्या गर्भपात करण्यासाठीही तयार होत्या. मात्र विवियन यांनी बाळाला जन्म देण्यास सांगितलं. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी विवेक मेहरासोबत लग्न केलं.
Leave a Reply