• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maratha-OBC Andolan : आझाद-मैदानावरुन मराठा-ओबीसी आमने-सामने, दोघांचे अर्ज, कोणाला मिळणार परवानगी?

August 19, 2026 by admin Leave a Comment


राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापलं आहे. एकीकडे अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा-ओबीसी समाजाने एकाच वेळी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. तर मनोज जरांगे यांच्या आधीच ओबीसी आंदोलनकांनी आझाद मैदानासाठी पोलीस ठाण्यात परवानगी मागितली आहे. त्यामुळे आझाद मैदानावरून दोन्ही गट आमनेसामने आले आहेत.

ओबीसींनी 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलनाची मागणी केली आहे. वकील मंगेश ससाणे यांनी 12 ऑगस्ट रोजी आझाद मैदान पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज केला आहे. परवानगी प्रक्रिया सर्वात आधी आम्ही अर्ज केला आहे, त्यामुळे नियमानुसार, ओबीसी आंदोलनाला प्रथम प्राधान्य मिळायला हवे, अशी भूमिका ससाणे यांनी घेतली आहे.

दोघांनी एकाच मैदानासाठी केले अर्ज 

वकील मंगेश ससाणे यांनी म्हटलं की, ‘आम्ही कायद्यानुसार आणि वेळेआधीच अर्ज दाखल केलाय. मनोज जरांगेंचं वरातीमागून घोडे चालणार नाही. आता प्रशासनाने अर्जाची तारीख आणि नोंदणीचा क्रम लक्षात घ्यावा. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा’. ओबीसी, व्हिजेएनटी, अलुतेदार, बलुतेदार समाजासाठी आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनाची पुढील रणनीती आणि नियोजनाबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसीतून कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक 

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा ओबीसीतून कुणबी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील आंदोलन पुन्हा मुंबई धडकण्याच्या तयारी आहे. त्यात ओबीसी संघटनांनी आधीच आझाद मैदानासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गटाकडून एकाच मैदान आणि कालावधीत मागणी केली आहे. त्यामुळे आझाद मैदान पोलीस प्रशासन कोणाला परवानगी देणार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in