
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. काल कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला. त्यानंतर आज देवदत्त कामत यांचा युक्तीवाद होईल. काल त्यांनी कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर आपला युक्तीवाद केला. अपात्रतेवर त्यांनी युक्तीवाद केला. शिवसेना पक्षाचा वापर शिंदेनी केल्याचेही त्यांनी म्हटले. यासोबतच भाजपाची सत्ता ज्या राज्यात आहे, तेथील हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबल्याचेही त्यांनी नमूद केले. यादरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेतले. आज देवदत्त कामत आपल्या युक्तीवादात अनेक विषयांवर बोलतील. या सुनावणीमध्ये अनेक मोठे आरोप निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर करण्यात आली. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज दुपारी 2 वाजात सुनावणीला सुरूवात होईल. यासह देश- विदेशातील, राज्यातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॅाग फॅालो करा.
Leave a Reply