• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Lucknow murder : बायको दीड कोटी पोटगी मागत होती, म्हणून तिच्यावर बँकेबाहेर झाडल्या गोळ्या

August 21, 2026 by admin Leave a Comment


2 दिवस रेकी, 30 मिनिटांत 2 हत्या आणि आत्महत्यादेखील ! लखनऊमध्ये झालेल्या भयानक हत्याकांडाने अख्खं शहर हादरलं. मानस नावाच्या इसमाने बँकेबाहेर आधी त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केली, नंतर त्याने त्याच्या बहिणीला संपवलं आणि अखेर स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या प्रकरणाने प्रचंड खळबळ माजली. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 2 कारणं समोर आली आहेत. पहिलं म्हणजे – जिची हत्या झाली ती बँक मॅनेजर दिव्या मिश्रा हिने घटस्फोटासाठी SBI अधिकारी मानस याच्याकडून दीड कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, आणि दुसरं कारण म्हणजे – मानसची मानसिक आजाराने ग्रस्त बहीण शीबा हिच्यासोबत रहायला दिव्या तयार नव्हती..

18 ऑगस्ट रोजी फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी होती. या दरम्यान मानस आणि दिव्या या दोघांमध्ये पोटगीच्या मुद्यावरून बराच वाद झाला. त्यानंतर मानस एवढा त्रास होता, वैतागला होता की त्याने पत्नी आणि बहिणीला मारण्याची आणि आत्महत्या करण्याची योजना आखली, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. त्यासाठी त्याने 3 शस्त्रं खरेदी केली आणि तब्बल 2 दिवस पत्नीची रेकीही केली, असं उघड झालं.

ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्या दिवशी ( गुरूवार) दुपारी 12 वाजता मानस हा रिक्षात बसून त्याची पत्नी दिव्या हिच्या ICICI बँकेत पोहचला. तिधे आधी दोघांमध्ये बराच वाद झाला, मारामारीही झाली, त्यानंतर मानसने दिव्याच्या चेहऱ्यावर सटासट दोन गोळ्या झाडल्या. बँकेच्या बाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संपूर्ण हत्याकांड रेकॉर्डही झालं. त्यानंतर तो रिक्षात बसून तिथून फरार झाला. घामाघूम झालेला मानस कसाबसा घरी पोहोचला. घरी जाऊन त्याने दार लावू घेतलं, टीव्हीवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली आणि त्यानंतर त्याने त्याची बहीण शीबा हिच्या डोक्यात गोळी झाडली. एवढंच नव्हे तर पत्नी आणि बहिणीला मारल्यनंतर मानसने स्वत:वर गोळी झाडून घेत आपलं आयुष्य संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसची पत्नी दिव्या ही यूट्यूबर प्रज्ञा मिश्रा यांची बहीण होती. माझा मेहुणा मानस हा सायको होता असा आरोप प्रज्ञाने केला. त्यामुळे मी त्याच्यापासून दूर रहायचे, असंही तिने सांगितलं. मानस आणि दिव्याने 9 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र वर्षागणिक त्यांच्यातील प्रेमाचे रूपांतर इतक्या टोकाच्या द्वेषात झाले की मानसने संपूर्ण कुटुंबच संपवलं.

9 वर्षांपूर्वी प्रेमविवाह, 1 वर्षापूर्वी पत्नीने सोडलं घर

नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, मानस आणि दिव्याने 2017 साली प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात दोघांचे संबंध चांगले होते. मात्र नंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद होऊ लागले. हळूहळू दोघांमधील दुरावा वाढत गेला आणि ते वेगवेगळे राहू लागले. 2018 मध्ये मानसच्या आईला कॅन्सर झाल्यानंतर दिव्या पुन्हा त्याच्यासोबत राहू लागली. याच काळात मानसच्या बहिणीला, शीबा हिला सोबत ठेवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. 2019 मध्ये मानसच्या आईचे निधन झाल्यानंतर दिव्या पुन्हा वेगळी राहू लागली. काही काळानंतर दोघांमध्ये पुन्हा संवाद झाला आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले.

पण 2025 साली बहिणीच्या मुद्द्यावरून दोघांमधील वाद पुन्हा वाढला. मी मानसच्या बहिणीसोबत राहणार नाही, असं दिव्याचं म्हणणं होतं, पण मानस यासाठी तयार नव्हता. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये दिव्याने ते घर कायमचं सोडलं.
मानसने हे नातं वाचवण्याचा बराच प्रयत्न केला आणि दिव्याशी अनेक वेळा चर्चा केली, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर हे प्रकरण लखनऊ फॅमिली कोर्टात पोहोचले. जानेवारी 2026 मध्ये दिव्याने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली आणि घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली.

विकत घेतली 3 शस्त्रं आणि रेकीलाही सुरूवात

मानसच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो सुमारे 3 महिन्यांपासून बँकेच्या ऑडिटच्या कामानिमित्त शहराबाहेर होता. मात्र परत येताच त्याला कोर्टातील 18 तारखेच्या सुनावणीबद्दल समजलं. तो कोर्टात गेला, पत्नीने दीड कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं तिथे त्याला समजलं. मात्र त्यामुळे तो खूप तणावात होता, असं पोलिसांनी सांगितलं.

18 ऑगस्टच्या सुनावणीनंतर मानसने पत्नी आणि बहिणीला मारण्याची आणि आत्महत्येची योजना आखली. त्यासाठी त्याने 2 दिवसांत 3 शस्त्र खरेदी केली. पोलिसांनी ती तीनही हत्यारं जप्ते केलीत, ती लोडेड होती. मात्र मानसने ती शस्त्र नक्की कुठून विकत घेतली, त्याचा अद्याप तपास सुरू आहे.

पत्नीला इशाऱ्याने बोलावलं, मारहाण करून झाडली गोळी

दिव्याचा मामेभाऊ मयंक दीक्षितच्या सांगण्यानुसार, 20 ऑगस्ट रोजी दिव्या बँकेच्या कामासाठी बाहेर गेली होती. काम संपवून जेव्हा ती दुपारी कारने ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा मानस आधीच तिथे होता. त्याने दिव्याला इशारा करून बोलावले , काही बोलायचं आहे, असं त्याने सांगितलं. मात्र दिव्या त्याच्याजवळ पोहोचताच मानसने तिच्यावर हल्ला केला, मारहाण केली. बँकेचे रक्षक आणि कर्मचारी तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र याचदरम्यान संधी साधून मानसने दिव्याच्या कपाळावर गोळी झाडली. गोळी लागताच दिव्या रस्त्यावर कोसळली. यानंतर मानस तेथून पळून गेला.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in