
काही जणांना प्रेमात अपयश पचवता येत नाही. प्रेमात अपयश आलं म्हणून ते टोकाचा निर्णय घ्यायला मागे-पुढे पाहत नाहीत. यात एकतर ते आपल्या जोडीदाराला संपवतात किंवा स्वत:ला. अड्डागल्ला कीर्तीने (24) सुद्धा असाच आई-वडिलांचा कुठलाही विचार न करता टोकाचा निर्णय घेतला. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कीर्तीने प्रेमात अपयश आलं म्हणून स्वत:च जीवन संपवलं. मुंबईत नोकरीला असलेली किर्ती पीजी हॉस्टेलमध्ये रहायला होती. 14 जुलै रोजी तिने हॉस्टेलच्या रुममध्ये आपलं जीवन संपवून घेतलं. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील तंगुतुरु मंडलच्या पाँडुरु गावात रहाणाऱ्या साई सुमंता बरोबर तिची सोशल मीडियावरुन ओळख झाली. ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.
आठ वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण साई सुमंता तिच्याबरोबर लग्न करायला तयार नव्हता. म्हणून किर्तीने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. किर्तीच्या अशा अकाली मृत्यूने तिच्या आई-वडिलांच्या मनाला खूप वेदना झाल्या. किर्तीचे पालक आणि नातेवाईक तिचा मृतदेह साईच्या पाँडुरु गावी घेऊन गेले. आमच्या मृत मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांध. त्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करु अशी मागणी किर्तीचे सर्व नातेवाईक करत होते. त्यामुळे काही काळ पाँडुरु गावात तणाव निर्माण झालेला. पोलीस आणि ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर किर्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आता या प्रकरणी चौकशी करतायत.
त्यामुळे ती खचून गेली
साई सुमंता सध्या कतरमध्ये सॉफ्यवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. वेगवेगळ्या शहरात, देशात राहत असूनही दोघे परस्परांच्या संपर्कात होते. वेळोवेळी ते भेटायचे. किर्तीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, अलीकडचे साईच्या कुटुंबाने त्याचं लग्न दुसऱ्या युवतीसोबत ठरवलेलं. या बद्दल समजल्यानंतर मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, असं किर्तीने साईला सांगितलं. पण त्याने नकार दिला. त्यामुळे ती खचून गेली होती. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये ओंगोल येथे बोलणं झालं. पण काही तोडगा निघाला नाही. साई लग्नासाठी तयार झाला नाही. मग किर्तीला समजावून पुन्हा मुंबईला पाठवण्यात आलं. पण तिने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
Leave a Reply