• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KL Rahul Video Viral: भर सामन्यात केएल राहुलने पडिकलला केलं KISS, ब्रोमांसचा व्हिडिओ व्हायरल

August 18, 2026 by admin Leave a Comment

IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉल येथे सुरु आहे. आज चौथ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना एक गोष्ट घडली ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीर केएल राहुल बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. 11 व्या षटकात, रमेश मेंडिसचा एक चेंडू राहुलच्या पॅडला लागला. श्रीलंकेच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि पंचांनी बोट वर केले. राहुल डीआरएस घेण्यास तयार नव्हता, पण नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलच्या आग्रहावरून त्याने रिव्ह्यू घेतला.

तिसऱ्या पंचांनी रिप्ले तपासले आणि त्यांना आढळले की चेंडू बॅटला लागला नव्हता. समोरून पाहता, केएल राहुल पायचीत (LBW) झाल्याचे दिसत होते. जेव्हा बॉल ट्रॅकर झाला, तेव्हा राहुल वाचला. चेंडू राहुलच्या गुडघ्याच्या खालच्या भागाला लागला होता, पण त्याचा पाय क्रीजच्या खूप पुढे होता, त्यामुळे चेंडू यष्टीवरून गेल्यासारखा दिसला. यामुळे केएल राहुल बाद होण्यापासून थोडक्यात वाचला.

KL Rahul hugging Devdutt Paddikal after a successful DRS suggested by him 😂 #SLvIND pic.twitter.com/vLEys0Vgk3

— Prateek (@prateek_295) August 18, 2026

जेव्हा डीआरएसने केएल राहुलला वाचवले, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने लगेच देवदत्त पडिक्कलला मिठी मारली आणि हेल्मेटमधूनच त्याला किसही केली. राहुल आणि पडिक्कल एकमेकांच्या खूप जवळचे आहेत. दोघेही खेळाडू कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतात. पहिल्या डावात पडिक्कलने भारतासाठी शतक झळकावले, तर राहुलने अर्धशतक केले.

डीआरएसमधून सुटल्यानंतर केएल राहुल काही मोठी कामगिरी करू शकला नाही. 15 व्या षटकात प्रभात जयसूर्याने त्याची विकेट घेतली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात राहुल मिड-ऑफकरवी झेलबाद झाला. त्याला लेग साईडला फटका मारायचा होता, पण चेंडू बॅटमधून नीट आला नाही. त्याने आपल्या खेळीत 35 धावा केल्या. राहुलने 47 चेंडूंचा सामना करत दोन चौकारांव्यतिरिक्त दोन षटकारही मारले. आता भारतीय संघ मालिकेतील आणखी एक सामना खेळणार आहे.  तो सामना 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. भारतीय संग ही मालिका जिंकते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in