
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचा समावेश आहे. १८ वर्षीय कुणालच्या हट्टामुळे तिघांनाही जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या आई-वडिलांना रात्री अंत्यसंस्कार होईपर्यंत नातेवाईकांनी कळू दिली नव्हती. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. एकाच कुटुंबातील असूनही तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र केले गेले नाहीत.
शुक्रवारी रात्री धनगरपिंपळगाव परिसरातील शिवलाल वस्ती येथील शेतात बारा ते साडेबारा या वेळेत मुरलीधर यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र झाले नाहीत. पोस्टमार्टमनंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आले. मात्र नातेवाईकांनी मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला, तर संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह आईच्या गावी मुकुंदवाडी येथे नेऊन तिथे अंत्यसंस्कार केले. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र का केले गेले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply