• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबियांच्या घरी पोलिसांचं पथक दाखल, कोणकोणत्या अँगलने होणार तपास, मोठा माहिती समोर

August 23, 2026 by admin Leave a Comment


Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबियांसाठी 21 ऑगस्ट 2026 हा दिवस काळा दिवस घडला आहे. कारण याच दिवशी एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी अखेरचा श्वास घेतला. आयफोनसाठी हट्ट करत असलेल्या 19 वर्षीय कुणाल चांदगुडे खवड्या डोंगराच्या कड्यावर पोहोचला आणि आत्महत्येचा प्रयत्न करत असताना वडील देखील कड्यावर पोहोचले. मुलगा आणि पतीचं डोळ्यासमोर झालेलं निधन पाहिल्यानंतर कुणाल याच्या आईने देखील खवड्या डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आता पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आता तपासासाठी पोलिसांचं पथक चांदगुडे यांच्या घरी पोहोचले असून, सर्वच बाजूने तपास करत आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपास सुरु केला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, आयफोनचे हप्ते थकल्यामुळे आणि नवीन आयफोनच्या हट्टामुळे ही घटना घडली असं सांगितलं जात आहे. पण फक्त आयफोनच्या हट्टामुळे इतकी मोठी घटना घडली असेल का? की दुसरं काही कारण आहे. याबाबत कोणतीच ठोस माहिती समोर आलेली नाही. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून, सहायक पोलिस निरीक्षक नरेश ठाकरे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या टीमने चांदगुडे यांच्या घराची तपासणी केली.

तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांदगुडे कुटुंबियांतील कोणत्याच सदस्याकडून पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली नसल्याची माहिती रामेश्वर गाढे यांनी दिली आहे. सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही, जेव्ही खवड्या डोंगरावरून धक्कादायाक घडली आहे. याआधी देखील अनेकांनी डोंगराच्या कड्यावरून आत्महत्या केली. म्हणून डोंगराच्या कड्यांवर सुरक्षा कठडे, संरक्षक जाळ्या व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. अशात आणखी किती बळी जाणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सांगायचं झालं तर, कुटुंबातील वाद देखील आता चव्हाट्यावर आले आहेत. कुणाल याची आई  संगीता चांदगुडे यांचे सोशल मीडिया अकाउंट समोर आल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळालं आहे. त्यांनी युट्यूबवर काही व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडिओंमध्ये त्यांनी पती मुरलीधर यांच्यासोबतच्या कौटुंबिक तणावाबद्दल आणि घरातील परिस्थितीबद्दल उघडपणे बोलले आहे. आता सर्व पैलूंचा तपास पोलीस करत आहेत.

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in