• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Khavdya Dongar : खवड्या डोंगर ठरतोय सुसाईड पॉइंट, कुणालच्या आधीही… किती तरुणांनी दिला जीव? धक्कादायक माहिती समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कुणाल चांदगुडे या तरुणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे पुढे सरसावले आणि त्यांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. एका क्षणात अख्खं कुटंब उद्ध्वस्त झालं. सोन्यासारखा संसार धुळीला मिळाला. या घटनेमुळे अख्खं छत्रपती संभाजीनगर सुन्न झालं आहे. अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. खवड्या डोंगरावरून जीव देण्याची ही पहिलीच घटना नाहीये. या पूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. हा डोंगर आता सुसाईड पॉइंट ठरत असल्याने येथील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

छत्रपती संभाजीनगरला तिसगाव परिसरात धुळे-सोलापूर महामार्गालगत हा डोंगर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याने या डोंगराचा सर्व भाग बदलून गेला आहे. बराच डोंगर कापण्यात आल्याने आता या ठिकाणी 246 फुटांचा कडा उभा आहे. म्हणजे एखादा सुळका असावा असा हा डोंगर आहे. शिवाय या डोंगराला कोणताच उतार नाही, त्यामुळे तो धोकादायक झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. कोणताही कठडा नाही, जाळ्या लावून प्रवेशास मनाई करण्यात आलेली नाही. तसेच कोणताही फलक लावून प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे या डोंगरावर कोणीही कधीही सहज जाऊ शकतो. त्यामुळे दुर्घटना होण्याच्या घटना घडत आहेत.

13 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, खवड्या डोंगरावरून आतापर्यंत 13 जणांनी उडी मारून जीवन संपवलं आहे. तर या ठिकाणी एक खुनाची घटना झाल्याचंही समोर आलं आहे. तर गतवर्षी एकाने त्याच्या बहिणीला कड्यावरून ढकलून दिल्याची घटनाही घडली होती. मात्र, या घटना अधूनमधून होत असल्याने हा डोंगर फार चर्चेत नव्हता. पण काल चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खवड्या डोंगर चर्चेत आला आहे. आता या ठिकाणी प्रवेशास मनाई करण्याची आणि या परिसरात सुरक्षा ठेवण्याची मागणी होत आहे.

कड्यावरून पडण्याची भीती

या डोंगरावर गेल्यानंतर कड्यावर कोणीही जाऊ शकतो. कडा अत्यंत उंच असल्याने त्यावरून पडण्याची शक्यता अधिक आहे. हवेच्या झोक्याने एखाद्याचा तोल जाऊ शकतो, किंवा कड्यावरून खाली पाहिल्यानंतरही एखाद्याचा तोल जाऊ शकतो इतका हा धोकादायक परिसर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या कड्या भोवती संरक्षक जाळ्यांचं जाळं पसरलं तरच कुणालाही धोका होणार नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in