• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Khavdya Dongar : अरे आईसाठी तर जग ना… खवड्या डोंगरावर सरपंचांनीही काढली होती कुणालची समजूत, पण…

August 22, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज  परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर  (Khavdya Dongar) जे घडलं त्याने अख्खं राज्य सुन्न झालं आहे. एका शुल्लक गोष्टीमुळे तीन जीव गेले, हसतं-खेळतं कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झालं आणि मागे राहिला तो फक्त विलाप. शुक्रवारी दुपारी  कुणालने चांदगुडे या 19 वर्षांच्या मुलाचा या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याला वाचवायला गेलेले वडीलही त्याच्यासोबत खाली कोसळले आणि त्यांचाही जीव गेला. आपल्या डोळ्यांदेखतच पती आणि पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं पाहून, कुणालच्या आईला दु:ख अनावर झालं आणि त्यांनीही डोंगवारून खाली उडी मारून आपलं आयुष्य संपवंल. डोळ्याच पात लवतं ना लवतं तोच अवघ्या काही क्षणात घडलेल्या या अतिशय दुर्दैवी घटनेत तिघांनी जीव गमावलाच. मात्र या भयानक दृश्याने गावकरी शोकाकुल आहेत, हळहळ व्यक्त होत्य पण या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी तिघांच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवले.
आई-वडिलांशी वाजलं आणि त्याने थेट डोंगरच गाठला
कुणाल मुरलीधर चांदवडे,मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी तिघा मृतांची नाव असून ते सर्वजण देवळाई सातारा परिसर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेच्या आधी कुणालचं ( वय 19) त्याच्या आई-वडिलांशी जोरदार भांडण झालं होतं, त्यानंतर रागाच्या भरातच तो सकाळी 10 च्या सुमारा खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्यापाठोपाठ त्याचे आई-बाबाही तिथे पोहोचले आणि मुलाची समजूत काढत त्याला घरी येण्यास सांगू लागले.
या भांडणाची, वादाची कुणकुण गावकऱ्यांनाही लागली आणि काही ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली, त्यापाठोपाठ पोलिस, बचावपथकाचे अधिकारी आणि गावचे सरंपचंही त्या डोंगरावर दाखल धाले. सुमारे तीन तास खड्या डोंगरावर हे नाट्य सुरू होते, अनेक जण कुणालशी बोलून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.
जे पाहिजे ते देतो तुला.. अरे आईसाठी तरी जग ना.. सरपंचांनीही काढली होती समजबत
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या हट्टावर कायम असलेल्या कुणालची गावच्या सरपंचांनीही खूप समजूत काढली, ते त्याला समजावत होते, त्यांनी त्याला विविध वचनंही दिली. ‘ मी गावचा सरपंच आहे ना. तुला जे पाहिजे ते घेऊन देतो रे. तू आधी गावात चल, घरी चल ‘ असं त्यांनी म्हटलं.  मात्र त्यांच बोलणं ऐकूनही कुणाल ऐकायला तयार नव्हता, ते पाहून अखेर सरपंचांनी त्याला भावनिक साद घातली. ‘अरे उडी मारून तुला काय मिळणारे ? तुझ्या आईसाठी तरी जग ना रे !’ असं म्हणत त्यांनी त्याला उडी न मारण्याचा आवाहन केलं. मात्र कुणाल कोणाचचं ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. ‘मला मरायचंय, हा एकच पर्याय आहे’ असं तो म्हणत होता, अशी माहिती काहींनी दिली.
कसं वाचवावं, रेस्क्यू टीमलाही कळेना
या घटनेची माहिती मिलताच बचाव पथकाच्या अधिकाऱ्यानी तिथे धाव घेतली होती, काहींनी डोंगराच्या खाली जाळीही लावण्याचा प्रयत्न केला. मात्र 19 वर्षांचा कुणाल वारंवार त्याची जाग बदलत होता, त्यामुळे तो नक्की कुठून उडी मारू शकतो, याचा अंदाज लावणंही बचावकर्मींसाठी अतिशय कठीण होतं.
वाळूज एमएआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 च्या सुमारास कुणालचे वडील हळूहळू त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याची समजूत काझू लागले, त्यांना त्याला मागे यायला सांगितलं. मातर् तेवढ्यात कुणालने अचानक खाली उडी मारली, त्याला पकडन वाचवायच्या नादात त्याचे वडीलही डोंगरावरून खाली कोसळले.
ते दोघेही डोंगराच्या दरीत खाली पडताच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहून शोक अनावर झालेल्या मुलाच्या आईनेही डोंगरावरुन खाली उडी मारली. त्यामुळे तिचाही मृत्यू झाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in