• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kangana vs Tapsee: स्वस्त कॉपी जन्माला का घातली?; कंगना तापसीवर भडकली, थेट आई-वडिलांनाच सुनावलं

August 23, 2026 by admin Leave a Comment


खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांचा तापसी पन्नूशी जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तापसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांच्यासोबतच्या वादावर भाष्य केल्यानंतर आता कंगना यांनी सोशल मीडियावरून तिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कंगना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये तापसीच्या कुटुंबीयांचा आणि तिच्या आगामी चित्रपटाचाही उल्लेख केला आहे. तापसीने ‘इंडिया टुडे’शी बोलताना कंगना यांच्यासोबतच्या वादाबद्दल सांगितलं की, दोघींची या वादाच्या आधी किंवा नंतर कधीही प्रत्यक्ष भेट झालेली नाही. तिच्या मते दोघींचे विचार आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत हे आपल्या संगोपनाचा आणि विचार करण्याच्या पद्धतीचा आरसा असतं, असं तपासीने म्हटलं.

तापसीच्या या वक्तव्यानंतर कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिच्यावर टीका केली. कंगना यांनी तापसीचं नाव थेट घेतलं नसलं तरी तिला पुन्हा एकदा ‘सस्ती कॉपी’ म्हणून हिणवलं. यावेळी तिने तापसीच्या पालकांवरही वैयक्तिक टिप्पणी केली.

कंगना यांची पोस्ट-

या पोस्टमध्ये कंगना यांनी लिहिलं, ‘एक ‘सस्ती कॉपी’ तिच्या आगामी बी-ग्रेड चित्रपटासोबत बाहेर पडली आहे. पण नेहमीप्रमाणे मीडियासाठी चर्चेचा केंद्रबिंदू फक्त कंगना राणौतच आहे. मात्र आत तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने निर्लज्जपणे माझ्या संगोपनाची आणि माझ्या आईवडिलांची खिल्ली उडवली. माझ्या मते, प्रत्येक आईवडील आपल्याा मुलांसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतात आणि कोणत्याही वादात मी कधीच कोणाच्या आईवडिलांना ओढत नाही. पण आज मला तिच्या आई-वडिलांनाही विचारावंसं वाटतं. माझ्या आईवडिलांसारखी ‘ओरिजिनल’ व्यक्ती त्यांना जन्माला का घालता आली नाही? स्वस्त कॉपी का जन्माला घातली? मला त्यांच्या प्रयत्नांबद्दल वाईट वाटतं.’

कंगना आणि तापसी यांच्यातील नेमका वाद काय?

तापसी आणि कंगना यांच्यातील वादाची सुरुवात 2019 मध्ये झाल्याचं म्हटलं जातं. तापसीने कंगना यांच्या ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं होतं, मात्र त्यावेळी तिने मुख्य भूमिका साकारलेल्या कंगना यांचंच नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे कंगना यांची बहीण रंगोली चंडेलने तापसीवर निशाणा साधत तिला ‘सस्ती कॉपी’ असं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर दोघींच्या वादाची चर्चा सुरू झाली. 2020 मध्ये बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि आऊटसायडर्स या मुद्द्यावर चर्चा पेटल्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं. त्यावेळी कंगना यांनी तापसीसह काही अभिनेत्रींबाबत कठोर शब्दांचा वापर केला होता. तर दुसरीकडे तापसीने कंगना यांच्याविरोधात वैयक्तिक टीका केली नसल्याचं अनेकदा सांगितलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in