
यजमान आयर्लंडने टीम इंडिया विरुद्ध पहिल्याच टी 20I सामन्यात धमाका केला आहे. आयर्लंडने बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लबच्या मैदानात सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आहेत. आयर्लंडसाठी कर्णधार लॉर्कन टकर याने सर्वाधिक धावा केल्या. तर गॅरेथ डेलानी यानेही फटकेबाजी केली. त्यामुळे आयर्लंडला 182 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यामुळे आता टीम इंडिया 183 धावांचं आव्हान किती ओव्हरआधी पूर्ण करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply