• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, CSK vs KKR: चेन्नई कोलकाता यांच्यात स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई, कोण ठरणार वरचढ?

April 13, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 22वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण या दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकात्याने चार सामने खेळले, त्यापैकी तीन सामने गमावले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे या दोन्ही संघांचा स्पर्धेतील पुढचा प्रवास सुकर करण्यासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्सने मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले. तर कोलकाता अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा स्थितीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे.

आयपीएलच्या इतिहासातील हे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. त्यांनी मिळून आठ ट्रॉफी जिंकल्या आहेत. पाच जेतेपद चेन्नई सुपर किंग्सने, तर तीन जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने नाव कोरलं आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही संघात 32 सामने झाले आहेत. या 32 सामन्यांपैकी चेन्नई सुपर किंग्सने 20 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सने 11 वेळा विजय मिळवला आहे. यात एक सामना अनिर्णित राहिला. 2025 या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला होता. तर चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्या सामन्यात 2 गडी राखून विजय मिळवला.

पिच रिपोर्ट

चेन्नई आणि कोलकाता हे संघ चेपॉक मैदानावर भिडणार आहेत. चेन्नईचं हे होमग्राउंड असून फलंदाजीला पूरक मानलं जातं. लाल मातीची खेळपट्टी असून सातत्यपूर्ण मोठ्या धावसंख्येसाठी अनुकूल मानली जाते. यावर्षी चेन्नईमध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत.दुसऱ्या सत्रात दव पडणे हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. हा सामना 14 एप्रिल रोजी, संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा 7 वाजता होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in