
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील अनेक संबंधितांबाबत पोलीस दल सखोल तपास करत आहे. इतकेच नाही, तर भोंदू खरातवर आत्तापर्यंत चौदा ते पंधरा गुन्हे दाखल झाले असून अनेक धक्कादायक अपडेट्स समोर आले आहेत. मात्र, यामध्ये रुपाली चाकणकर हे नाव अनेकांकडून घेतले जात होते. त्यांना अजूनही अटक का झाली नाही, असा थेट सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.
रुपाली चाकणकरांना अटक केली जात नाही, याचा अर्थ त्यांना कोणी ना कोणी वाचवत आहे, असेही राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, ‘चाकणकर बाई ह्या भोंदू खरातच्या ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या, म्हणूनच महिलांना विश्वास बसला असावा की भोंदू खरात योग्य व्यक्ती आहे. चाकणकरांच्या जागी कोणती सामान्य महिला असती, तर तिला आधीच अटक झाली असती.’
Leave a Reply