• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : सामना सुरु असताना मैदान सोडणाऱ्या रोहित शर्मा बाबत वाईट बातमी, मुंबई इंडियन्सला अजून एक धक्का

April 15, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 मध्ये आधीपासूनच खराब खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमला आणखी एक धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माचं पुढच्या मॅचमध्ये खेळणं निश्चित नाहीय. रोहित शर्माला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. आरसीबी विरुद्ध 19 धावांवर खेळताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत जाणवलेली. तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेलेला. आता रोहित शर्मा कदाचित पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार नाही असं बोललं जातय. रोहित शर्माला झालेली दुखापत किती गंभीर आहे, या बद्दल अजून माहिती मिळालेली नाही. पण रोहितला पुढच्या सामन्यात विश्रांती दिली जाईल असं दिसतय.

रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत होणं ही वाईट बातमी आहे. कारण संपूर्ण करिअरमध्ये रोहितला या दुखापतीचा सर्वात जास्त त्रास झाला. जेव्हा कधी हॅमस्ट्रिंगच्या मसलचा त्रास सुरु झाला, त्याला रिकव्हरीला वेळ लागला. रोहित शर्माची दुखापत यावेळी सुद्धा गंभीर असेल तर पुढच्या काही सामन्यांना तो मुकू शकतो. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिसला सुद्धा नव्हता. याचा अर्थ असा आहे की, पुढच्या सामन्यात रोहित शर्माचं खेळणं कठीण आहे. कदाचित त्याला पुढच्या सामन्यातही आराम करावा लागेल. प्रश्न हा आहे की, रोहित बाहेर बसला, तर त्याची जागा कोण घेईल?. मुंबई इंडियन्सकडे दानिश मालेवर सारखा टॅलेंटेड खेळाडू आहे. पण त्याच्यावर टीम विश्वास दाखवेल का?.

.. तर अजून एक पराभव नक्की

रोहित शर्माची दुखापत ही मुंबई इंडियन्ससाठी चिंतेची बाब आहेच. पण सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांच्या फॉर्मने सुद्धा चिंता वाढवली आहे. त्यांच्याकडून धावा होत नाहीयत. जसप्रीत बुमराहला विकेट मिळत नाहीय. हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्टचा सूर सुद्धा हरवलेला आहे. म्हणूनच आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या टीमने एकच मॅच जिंकली आहे. मुंबईच्या टीमला पुनरागमन करायचं असेल तर सर्व खेळाडूंनी योगदान देणं गरजेचं आहे. पंजाब किंग्स विरुद्ध अशीच कामगिरी सुरु राहिली तर अजून एक पराभव नक्की आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • करिअरपासून पैशांपर्यंत… मेष राशीसह ‘या’ 5 राशी होतील श्रीमंत
  • ‘ही’ रोपं घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल सोबतच संपत्तीही होईल आकर्षित
  • ड्रायव्हर्ससाठी ‘ही’ गोष्ट खास, वादांपासून सुटका मिळवण्यासाठी, विम्याच्या कामात ठरेल उपयुक्त
  • नखांवरुन ओळखा कोणाच्या मनात काय चाललंय? 10 सेकंदात मिळेल उत्तर
  • ‘ही’ 3 झाडं तुमच्या घरात कधीच लावू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in