• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय, आता गेलचा रेकॉर्ड निशाण्यावर

May 23, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशी या 15 वर्षीय युवा फंलदाजाने आतापर्यंत आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) अनेक विक्रम उद्धवस्त केले आहेत. वैभवने अनेक दिग्गज आणि अनुभवी गोलंदाजांची धुलाई करुन खोऱ्याने धावा केल्या आहेत. वैभवने हाच तडाखा 19 मे रोजी कायम ठेवत फटकेबाजी केली. राजस्थान रॉयल्सच्या या फलंदाजाने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या निर्णायक सामन्यात 93 धावांची खेळी साकारली. वैभवने या खेळीत थोडेथोडके नव्हे तर तब्बल 10 षटकार लगावले. वैभवने या दरम्यान महारेकॉर्ड केला. वैभव एका मोसमात 50 षटकार लगावणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यामुळे आता वैभवच्या निशाण्यावर ख्रिस गेला याचा रेकॉर्ड आहे. वैभवला त्या विक्रमसाठी किती षटकारांची गरज आहे? हे जाणून घेऊयात.

वैभवची निर्णायक सामन्यात स्फोटक खेळी

राजस्थानसाठी प्लेऑफच्या हिशोबाने लखनौ विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा होता. लखनौने या सामन्यात राजस्थानसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वैभव या धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात करण्यात अपयशी ठरला. वैभवने पहिल्या 10 चेंडूत अवघ्या 5 धावा केल्या. मात्र त्यानंतर वैभवन गिअर बदलला. वैभवने त्याच्या डावातील 28 चेंडूत 88 धावा ठोकल्या. वैभवने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने या दरम्यान 19 व्या मोसमात 500 धावा पूर्ण केल्या. वैभवने अवघ्या 13 डावांत ही कामगिरी केली.

वैभवने अर्धशतकादरम्यान तडाखा कायम ठेवला. वैभवने त्याच्या खेळीतील सातवा षटकार लगावताच इतिहास घडवला. वैभवने 19 व्या मोसमात 50 षटकार पूर्ण केले. आयपीएल स्पर्धेत एकाच मोसमात 50 पेक्षा अधिक षटकार लगावण्याची ही चौथीच वेळ ठरली. याआधी आंद्रे रसेल याने 2019 साली 52 षटकार लगावले होते. वैभवने फटकेबाजी कायम राखत रसेललाही मागे टाकलं.

आता गेलचा विक्रम निशाण्यावर

वैभवची लखनौ विरुद्ध शतक करण्याची संधी हुकली. मात्र वैभव राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. वैभवने 38 चेंडूत 93 धावा केल्या. वैभवच्या नावावर या खेळीनंतर 19 व्या मोसमात 13 डावांत 53 षटकार झाले आहेत. वैभव अशाप्रकारे आयपीएल स्पर्धेत कोणत्याही मोसमात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.

वैभव ख्रिस गेलला पछाडणार?

वैभवपुढे या यादीत माजी फलंदाज ख्रिस गेल आहे. ख्रिस गेल याने 2012 साली एकूण 59 षटकार लगावले होते. त्यामुळे वैभव गेलच्या या विक्रमापासून 7 षटकारांनी दूर आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी साखळी फेरीतील उर्वरित 1 सामना जिंकणं बंधनकारक आहे. राजस्थानने हा सामना जिंकल्यास ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. त्यामुळे राजस्थानला आणखी 1 सामने खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे वैभव ख्रिसचा 59 षटकारांचा विक्रम सहज मोडीत काढू शकेल. त्यामुळे आता राजस्थान साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?
  • US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
  • Revati Sule Wedding Photo: रेवती सुळेच्या सासुबाईंना पाहिलंत का? पिंक साडीने वेधले सर्वांचे लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in