• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : आल्या आल्या शतक, पंजाब विरुद्ध धमाका, क्विंटन डी कॉकचा महारेकॉर्ड, काय केलं?

April 16, 2026 by admin Leave a Comment


दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉक याला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात खेळण्यासाठी बरेच दिवस प्रतिक्षा करावी लागली. मुंबई इंडियन्सने क्विंटनला डी कॉकला आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली. मुंबईचा ओपनर रोहित शर्मा याला आरसीबी विरुद्ध झालेल्या दुखापतीमुळे पंजाब विरूद्धच्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे क्विंटनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली. क्विंटनने या संधीचा फायदा घेतला. क्विटंनने या मोसमातील आपल्य्या पहिल्याच सामन्यात धमाका केला. क्विंटनने मुंबई अडचणीत असताना डाव सावरला. क्विटंनने नमन धीर याच्यासह फटकेबाजी करत मुंबईचा डाव सावरला. तसेच क्विटंनने शतक झळकावलं. क्विटंनने यासह महारेकॉर्ड केला.

अर्शदीप सिंह याने मुंबईला तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर 2 झटके दिले. त्यामुळे मुंबईची 2 आऊट 12 अशी स्थिती झाली. त्यानंतर क्विंटन आणि नमन या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. क्विंटनने यासह शतक झळकावलं. क्विंटनने अवघ्या 53 बॉलमध्ये 190.57 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. क्विटंनने या खेळीत 7 षटकार आणि तितकेच चौकार लगावले.

क्विंटनचं ऐतिहासिक शतक, वानखेडेत महारेकॉर्ड

क्विंटनने या शतकासह महारेकॉर्ड केला. क्विंटन 19 व्या मोसमात शतक करणारा मुंबईचा पहिला आणि संजू सॅमसन याच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला. तसेच क्विंटन आयपीएल स्पर्धेत 3 वेगवेगळ्या संघांसाठी शतक करणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला. क्विंटनने पंजाबआधी दिल्ली डेअरडेविसल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 100 धावा केल्या होत्या. तसेच क्विंटनचं हे टी 20 कारकीर्दीतील नववं शतक ठरलं.
क्विंटनने यासह रायली रुसो, विराट कोहली आणि साहिबजादा फरहान यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

नमन धीर याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

क्विंटन डी कॉक याने पंजाब विरुद्ध षटकाराने आपल्या धावांचं खातं उघडलं. मात्र मुंबईचे पहिले 2 फलंदाज स्वस्तात आऊट झाले. अर्शदीपने मुंबईच्या रायन रिकेल्टन (2) आणि सूर्यकुमार यादव (0) या दोघांना आऊट केलं.

लाईव्ह स्कोअरकार्ड

क्विंटनने त्यानंतर मैदानात आलेल्या नमन धीर याच्यासह कमाल केली. क्विंटन आणि नमन या दोघांनी शतकी भागीदारी केली. नमन आणि क्विंटन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 68 बॉलमध्ये 122 रन्सची पार्टनरशीप केली. नमनने मुंबईसाठी अर्धशतक झळकावलं. नमनने 31 बॉलमध्ये 50 रन्स केल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?
  • 17 April Horoscope : 17 एप्रिलच्या दिवशी पडणार पैशांचा पाऊस, नशीब चांगलंच फळफळणार; वाचा राशीभविष्य
  • IPL 2026 : आल्या आल्या शतक, पंजाब विरुद्ध धमाका, क्विंटन डी कॉकचा महारेकॉर्ड, काय केलं?
  • Quinton de Kock: क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले, रोहित शर्मालाही टाकलं मागे
  • 100 वर्षांची परंपरा आणि 50 लाखांचा विमा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आजही आहे नंबर 1

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in