
हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतली आहे. टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 23 व्या सामन्यात बांगलादेशवर मात करत 2 गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशने टीम इंडियासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान ओपनर शफाली वर्मा हीच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज आणि सुरक्षितपणे पूर्ण केलं. शफालीला तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं. भारताचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह बाद फेरीतील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. टीम इंडियाने 137 धावांचं आव्हान हे 5 विकेट्स राखून 19 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 16.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 139 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम राखलं आहे.
Leave a Reply