• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL 1st Test : फक्त 2 टेस्टमध्ये मानव सुथारने जे केलं, ते बुमराह-शमीच्या सारख्या दिग्गजांना सुद्धा नाही जमलं

August 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टेस्ट सीरीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने यजमान श्रीलंकेला 165 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. टीम इंडियाने सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. मोठं मोठ्या गोलंदाजांना जे आपल्या संपूर्ण करिअरमध्ये जमलं नाही, ते सुथारने पहिल्याच कसोटी सामन्यात करुन दाखवलं. जसप्रीत बुमराहला सुद्धा हे जमलं नाहीय. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 10 विकेट त्याने घेतले. गॉल टेस्ट मॅचच्या शेवटच्या दिवशी बुधवारी 19 ऑगस्टला टीम इंडियाने श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर गुंडाळला. भारतीय टीमने सहज हा कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेचा डाव गुंडाळण्यात युवा स्पिनर सुथारने महत्वाची भूमिका बजावली. सुथारने या इनिंगमध्ये 55 धावा देऊन 6 विकेट काढले. शेवटचे 4 विकेट तर सुथारने 10 चेंडूत काढले. त्यात एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट काढले.

सुथारने या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतले होते. दोन्ही डावात मिळून एकूण 10 विकेट घेतले. करिअरमधील दुसऱ्याच कसोटी सामन्यात सुथारने ही कमाल केली. अनेक दिग्गजांना त्याने मागे टाकलं. जागतिक क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज गोलंदाज झाले, ज्यांनी भरपूर विकेट घेतले. अनेकदा एकाच डावात 5 विकेट घेण्याची कमाल केली. पण एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून 10 विकेट नाही घेतले.

आपल्या नावावर मोठं यश नोंदवलं

टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी असो किंवा ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, जॉश हेजलवूड, जेसन गिलेस्पी, गॅरी सोबर्स, जोएल गार्नर यांनी सुद्धा आपल्या पूर्ण करिअरमध्ये मिळून 10 विकेट घेतले नाहीत. राजस्थानातून येणाऱ्या सुथारने फक्त दोन कसोटी सामन्यात ही कमाल करुन आपल्या नावावर मोठं यश नोंदवलं आहे.

या मॅचमध्ये त्याने एकूण 7 विकेट घेतले

दोन कसोटी सामन्यात सुथारने आतापर्यंत एकाच डावात पाच विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे.याआधी अफगाणिस्तान विरुद्ध डेब्यू टेस्ट मॅचमध्ये सुथारने एकाच डावात 6 विकेट घेतले होते. या मॅचमध्ये त्याने एकूण 7 विकेट घेतले. दोन कसोटी सामन्यात सुथारने 11.35 च्या सरासरीने 17 विकेट घेतले आहेत.

 

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in