• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: श्रीलंकन संघात दोन बदल, दिवसा 22 चौकार षटकार मारलेल्या खेळाडूची संध्याकाळी संघात एन्ट्री

August 20, 2026 by admin Leave a Comment


दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 165 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. मालिका हातून जाणार नाही हे निश्चित झालं आहे. पण दुसरा कसोटी सामना जिंकून श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न असणार आहे. हा कसोटी सामना कोलंबोत होणार असून श्रीलंकेला दोन धक्के बसले आहेत. दिनेश चंडीमल पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. कनकशनमुळे त्याची जागा भरण्यात आली होती. आता आयसीसी नियमानुसार, 7 दिवस मैदानात उतरू शकणार नाही. त्यामुळे 23 ऑगस्टला सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाद झाला आहे. तर कुसल मेंडिस अजूनही अनफिट आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची जागा कामिल मिशारा आणि सहन अराच्चिगे यांनी घेतली आहे.

कामिल मिशारा आणि सहन अराच्चिगे यांची कसोटी संघात अचानक झालेल्या एन्ट्रीने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण दोन्ही खेळाडू देशांतर्गत टी20 स्पर्धेत संघाचा भाग होते. दोघेही नॉनडिस्क्रिप्टेस क्रिकेट क्लबसाठी खेळत होते. पण संघात निवड होण्यापूर्वी या दोघांनी 20 ऑगस्टच्या दुपारी एक सामना खेळला होता. त्याने मिशाराने आक्रमक खेळी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ब्लूमफिल्ड विरूद्धच्या सामन्यात मिशाराने फक्त 72 चेंडूत 145 धावांची आक्रमक खेळी केली. टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही श्रीलंकन फलंदाजाचा हा मोठा स्कोअर आहे. त्याने या सामन्यात 11 चौकार आणि 11 षटकार मारले होते.

दुसरीकडे, सहन अराच्चिगेने फलंदाजीत तर योगदान दिलं नाही. पण फिरकीच्या जोरावत दोन विकेट काढल्या. मिशारा आणि अरच्चिगे श्रीलंकेसाठी वनडे आणि टी20 सामने खेळले आहेत. पण कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू झालेलं नाही. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना कोलंबो कसोटीत डेब्यू करण्याची संधी आहे. पण या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे सांगणं कठीण आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज असलेल्या अराच्चिगेने भारत अ संघांविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. दुसऱ्या सामन्यात त्याने 127 धावा करून लंका ‘अ’ संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होती. हा सामना भारत ‘अ’ संघाने 10 गडी राखून जिंकला असला तरी, संघाचे नेतृत्व करताना पाचव्या क्रमांकावर त्याने केलेली झुंजार खेळी चर्चेत राहिली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in