• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर पकड मिळवली पण धावगतीला काही अंशी ब्रेक लागला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 9 गडी गमवून 460 धावा केल्या आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी 43 षटकांचा खेळ झाला आणि 172 धावा आल्या. त्यात श्रीलंकेने फिरकीच्या जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघ पहिल्या डावात 2 गडी गमवून 288 धावांवर खेळत होता. पण या धावांचा पुढे खेळताना भारताच्या धडाधड सात विकेट पडल्या. भारताने अवघ्या 172 धावा करताना 7 विकेट गमवल्या आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुलदीप यादव 12 आणि प्रसिद्ध कृष्णा 1 या धावसंख्येवर नाबाद तंबूत परतले. आता तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय किती धावा करणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

भारताकडून देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत ही जोडी दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरली होती. पण पावसामुळे खेळपट्टीचा पूर्ण अंदाजच बदलून गेला होता. ऋषभ पंत चुकीचा फटका मारताना 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला केएल राहुल आला आणि 82 धावा करून तंबूत परतला. देवदत्त पडिक्कलने 150 धावांचा पल्ला ओलांडत धावसंख्येत भर घातली. पण त्याचा खेळही 167 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेलकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण रवींद्र जडेजा 13 धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे भारताची स्थिती नाजूक झाली. ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने डाव सावरल्याने भारताने मजबूत स्थितीत आला.

ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने सातव्या विकेटसाठी 66 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने 68 चेंडूत 51 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर लगेचच मानव सुथारही 24 धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजचा खेळ 11 धावांवर आटोपला. त्यामुळे भारत सर्वबाद होतो की काय असा प्रश्न होता. पण कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी झुंज दिली. आता तिसऱ्या दिवशी ही जोडी पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने 4, केशारा नुवांथाने 3 आणि असिथा फर्नांडोने 1 विकेट काढली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in