• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL : तिसऱ्या क्रमांकाचं नाणं खणखणीत वाजलं, देवदत्त पडिक्कलने अर्धशतकी खेळीसह करून दाखवलं

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालची विकेट श्रीलंकेला फुकटात मिळाली. कारण केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात संवादाचा अभाव दिसला. त्यामुळे यशस्वी जयस्वालची विकेट पडली. असं असताना सर्वांच्या नजरा या देवदत्त पडिक्कल याच्याकडे खिळल्या होत्या. कारण साई सुदर्शन या मालिकेला मुकल्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी त्याला पसंती दिली होती. सराव सामन्यात केलेल्या शतकी खेळीनंतर त्याचा विचार केला गेला. त्याने हा विश्वास योग्य ठरवून दाखवला आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने सावध आणि संघाला सावरणारी फलंदाजी केली. त्याने या सामन्यात अर्धशतक ठोकून संघाला सावरण्याची भूमिका बजावली. यशस्वी जयस्वालची विकेट पडल्यानंतर कुठे टीम इंडियावर दबाव आणू दिला नाही. उलट केएल राहुलसोबत शतकी भागीदारी केली.

देवदत्त पडिक्कलने 81 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. आता त्याची कूच शतकाकडे सुरू झाली आहे. देवदत्त पडिक्कलचं कसोटी क्रिकेटमधील हे दुसरं अर्धशतक आहे. यापूर्वी देवदत्त पडिक्कलने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध धरमशाला कसोटीत पदार्पण करताना 65 धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं होतं. इतकंच काय तर हा सामना सुरू होण्यापूर्वी कोलंबो येथे झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात देवदत्त पडिक्कलने 142 धावांची जबरदस्त शतकी खेळी केली होती. 103 धावांवर रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर पुन्हा मैदानात उतरून त्याने धावा काढल्या होत्या.

FIFTY for Devdutt Padikkal! 👏

He brings up his second half-century in Test cricket as #TeamIndia move past 120. 🙌

Updates ▶ https://t.co/WHXkfnivbw#SLvIND pic.twitter.com/wwt9keORqD

— BCCI (@BCCI) August 15, 2026

बॉर्डर गावस्कर 2024 कसोटी मालिकेत शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने देवदत्त पडिक्कलला तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हा पहिल्या डावात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. मात्र दुसर्‍या त्याने 71 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकारांसह 25 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 295 धावांनी जिंकला होता. त्यानंतर देवदत्त पडिक्कला कसोटीत संधी मिळाली नव्हती. पण आता मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in