• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL : गॉल कसोटीत भविष्यासाठी टीम इंडियाला मिळाले दोन चांगले प्लेयर, श्रीलंकेला तोडलं, दोघेही लंबी रेस के घोडे

August 19, 2026 by admin Leave a Comment

सध्या भारत आणि श्रीलंकेमध्ये गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा पाचवा दिवस आहे. श्रीलंकेचे सहाविकेट शिल्लक असून त्यांना विजयासाठी 276 धावांची आवश्यकता आहे. हा कसोटी सामना सुरु होण्याआधी भारतीय फलंदाज फिरकीसमोर कमकुवत असल्याची चर्चा होती. मानव सुथार बद्दल सुद्धा प्रश्न होते. कुलदीप, जडेजासारखे दिग्गज टीममध्ये असताना मानव सुथार छाप उमटवणार का? हा काहींच्या मनात प्रश्न होता. पण कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी परिस्थिती पूर्ण बदलेली आहे. कसोटीच्या पहिल्या दोन दिवसात देवदत्त पडिक्कलने जबरदस्त फलंदाजी केली. त्यानंतर मानव सुथारने आपल्या फिरकीच्या जाळ्यात श्रीलंकन फलंदाजांना अलगद अडकवलं. टीम इंडियासाठी या कसोटी सामन्यात पॉझिटिव्ह काय, तर पडिक्कल आणि मानव. त्याचवेळी आपण लंबी रेस के घोडे असल्याचाही संदेश त्यांनी दिला आहे.

देवदत्त पडिक्कलचा हा पहिला श्रीलंका दौरा होता. त्यासाठी त्याने खूप आधीच तयारी केली होती. बंगळुरुमध्ये बालपणीच्या कोचसोबत मिळून कूकाबुरा बॉलने वेगवेगळ्या हाइटच्या फिरकी गोलंदाजांसोबत कसून सराव केला होता. कुठल्याही वीराच्या अभ्यासाची खरी परीक्षा युद्धाच्या मैदानात होते. लंकेचा स्पिनर प्रभात जयसूर्याला गॉलचं राजा म्हटलं जातं. पडिक्कलने जयसूर्यासह लंकेच्या सर्वच फिरकी बॉलर्सची गोलंदाजी फोडून काढली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळला.

त्याच्यामुळे श्रीलंकेची टीम बॅकफूटवर गेली

पहिल्या दिवशी शतक झळकवल्यानंतर दुसऱ्यादिवशी सुद्धा त्याने कमालीच फुटवर्क दाखवलं. पडिक्कल 167 धावा करुन बाद झाला. पण त्याने भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने 462 धावा केल्या. श्रीलंकेची टीम बॅकफूटवर गेली, त्याचं कारण पडिक्कल आहे. पडिक्कलला साई सुदर्शनला दुखापत झाल्यामुळे संधी मिळाली. त्याने ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. आता टीम इंडियात तो नंबर 3 पोजिशनसाठी प्रबळ दावेदार बनला आहे. पडिक्कलने आधी सराव सामन्यात शतक ठोकलं नंतर गॉल कसोटीत. पडिक्कलने टेक्निकमध्ये छोटे-छोटे बदल केले. पडिक्कलची खरी परीक्षा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांविरुद्ध होईल.

श्रीलंकन गोलंदाजांपेक्षा त्याने जास्त चेंडू वळवला

या कसोटी सामन्यात कुठल्या खेळाडूने आश्चर्याचा धक्का दिला असेल तर तो मानव सुथार आहे. मानवने या पीचवर दुसऱ्या कुठल्या गोलंदाजाच्या तुलनेत सर्वात जास्त चेंडू वळवले. मानवने पहिल्या इनिंगमध्ये 21.4 ओव्हर टाकले. त्यात 74 टक्के चेंडूंना 4.5 डिग्रीपेक्षा जास्त टर्न मिळाला. श्रीलंकन गोलंदाजांपेक्षा मानव सुथारने जास्त चेंडू वळवला. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 4 विकेट काढले. 284 धावांवर श्रीलंकेचा डाव आटोपला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in