• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: कोलंबो कसोटीपूर्वी श्रीलंकन संघाने टाकले फासे, 1996 वर्ल्ड कप विजेत्या सदस्याकडे मोठी जबाबदारी

August 22, 2026 by admin Leave a Comment


Hashan Tillakaratne: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोत सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला हा सामना जिंकणं भाग आहे. दुसरीकडे, श्रीलंकेपुढे मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. असं असताना श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने माजी दिग्गज फलंदाज आणि 1996 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या हर्षण तिलकरत्ने यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती केली आहे. तिलकरत्ने यांनी 21 ऑगस्टपासून श्रीलंकन क्रिकेटच्या नॅशनल हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये खेळाडूंसोबत काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यांचा हा करार 31 डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. म्हणजेच वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजी प्रशिक्षण दिलं जाईल.

श्रीलंकेला नव्या फलंदाज प्रशिक्षकाची गरज का पडली?

थिलिना कंदाम्बी यांनी पद सोडल्यानंतर भारताचा माजी सलामीवर फलंदाज विक्रम राठोड यांनी 18 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत कन्सल्टन्सीच्या आधारावर संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी दिली. विक्रम राठोड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि पुढच्या कसोटी मालिकेचं गणित पाहता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. आता तिलकरत्नेंच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकन संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यांच्या देखरेखीत गॉल कसोटीतील चुका दुरूस्त करून कोलंबोत उतरण्याची तयारी आहे. आता त्यांचं मार्गदर्शन किती कामी येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिका बरोबरीत सोडवायची असल्यास श्रीलंकेला काहीही करून दुसरा सामना जिंकणं भाग आहे.

कोण आहेत हर्षण तिलकरत्ने आणि कोचिंगचा अनुभव किती?

हर्षण तिलकरत्ने 59 वर्षांचे असून श्रीलंकन क्रिकेटमधील मोठं नाव आहे. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोचिंगचा चांगला अनुभव आहे. त्यांनी श्रीलंकेसाठी 83 कसोटी आणि 200 वनडे सामने खेळले आहे. त्यांच्या नावावर 8200हून अधिक धावांची नोंद आहे. तर 1996 मध्ये श्रीलंकेला वर्ल्डकप जिंकवून देण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं. याह त्याने 2018 ते 2020 या कालावधीत अंडर 19 वर्ल्डकपपर्यंत श्रीलंकेच्या अंडर 19 संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.

फ्रेंचायझी क्रिकेटमध्येही प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. लंका प्रीमियर लीग 2020च्या पहिल्या पर्वात कँडी टस्कर्स संघाचे हेड कोच होते. त्यानंतर जून 2021 मध्ये त्यांनी श्रीलंकन महिला संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली. 2022 मध्ये महिला आशिया स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचवलं. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये दोन वर्षांसाठी बांग्लादेश महिला क्रिकेटच्या हेड कोचची भूमिका बजावली होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in