• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs IRE: हार्षित राणाने विकेट घेताना केली चूक, नुकसान होता होता राहिलं! असं संकट टळलं

June 28, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 आणि आयपीएल स्पर्धेला मुकल्यानंतर हार्षित राणाचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. आयर्लंड दौऱ्यापासून त्याच्या नव्या इनिंगची सुरूवात झाली आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही त्याने तशीच कामगिरी केली. हर्षित राणाने तीन षटकं टाकली आणि 17 धावा देत 1 गडी बाद केला. पहिल्याच षटकात त्याने विकेट काढली. पण त्यानंतर त्याने केलेल्या चुकीमुळे टीम इंडियाची धाकधूक वाढली होती. भारताने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं. गोलंदाजी करताना संघाचं दुसरं षटक हार्दिक राणाच्या हाती सोपवलं होतं. त्याने या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ओपनर टिम टॅक्टरला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. पण विकेट घेतल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना एक चूक केली आणि क्रीडाप्रेमींना निराश केलं. त्या चुकीचा मागच्या सामन्यात फटका बसला होता. हार्षित राणाने ही चूक अर्शदीप सिंगच्या षटकात केली.

हार्षित राणाने झेल सोडला

आयर्लंडविरुद्ध संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग मैदानात आला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॉस अडेयरच्या बॅटची कडा लागली आणि चेंडू विकेटच्या मागे वर चढला. त्यामुळे झेल घेण्यासाठी विकेटकीपर इशान किशन आणि हार्षित राणा यांनी धाव घेतली. दोघंही मागच्या बाजूला धावले. हा झेल इशान किशनला पकडायचा होता. पण हार्षित राणाने झेल पकडताना बाजूला जाण्याऐवजी पकडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हा झेल त्याच्यासाठी कठीण होता आणि झालंही तसंच.. हार्षित राणाने हा झेल सोडला आणि चौकार गेला. मागच्या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचा असाच फटका बसला होता. भारतीय संघाने तीन झेल सोडले होते. हे झेल भारतीय संघाला चांगलेच महागात पडले होते.

तिलक वर्माने चूक सुधारली

रॉस अडेयरला जीवदान मिळाल्याने त्याचा फटका बसेल असं वाटलं होतं. हा झेल पकडला असता तर रॉस अडेयरचा खेळ 12 धावांवर आटोपला असता. पण त्याच्या आणखी चार धावा जोडल्या गेल्या. पण दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला. कवर्स उभ्या असलेल्या तिलक वर्माने त्याचा सोपा झेल पकडला. त्यामुळे रॉसचा खेळ 16 धावांवर आटोपला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in