• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: वनडे वर्ल्डकप 2023 पासून तीन वर्षे संघातून बाहेर, आता 2027 स्पर्धेसाठी संघात एन्ट्री

June 21, 2026 by admin Leave a Comment

IND vs ENG ODI Series: भारताने अफगाणिस्तानला वनडे मालिकेत 3-0 ने मात दिली. आता शुबमन गिलच्या नेतृत्वात पुढच्या मिशनची तयारी सुरू झाली आहे. भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका 14 जुलैपासून सुरू होणार असून या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. या मालिकेपासून टीम इंडियाचं वनडे वर्ल्डकप 2027 मिशन सुरू होणार आहे. कारण इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेतील स्थिती जवळपास सारखी आहे. असं असताना निवड समितीने या मिशनसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात स्थान दिलं आहे. वनडे वर्ल्डकप 2023 नंतर जसप्रीत बुमराह या फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यामुळे जवळपास तीन वर्षांनी जसप्रीत बुमराह वनडे फॉर्मेटमध्ये खेळणार आहे. जसप्रीत बुमराहने शेवटचा वनडे सामना 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता.

बीसीसीआयच्या निवड समितीने जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी आणि त्याला पूर्णपणे फिट ठेवण्यासाठी या फॉर्मेटपासून दूर ठेवलं होतं. आयसीसी स्पर्धांच्या हिशेबाने फक्त टी20 आणि कसोटी सामने खेळत होता. पण आता मिशन 2027 समोर असल्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला धार काढण्यासाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

जसप्रीत बुमराहची संघात एन्ट्री झाल्याने इंग्लंडची धाकधूक वाढली आहे. कारण त्याचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड खूपच जबरदस्त आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 7 सामन्यात 5.88 च्या इकोनॉमी रेटने 17 विकेट घेतल्या आहेत. यात एकदा पाच विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघ बांधणी सुरू आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

इंग्लंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in