• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: पहिल्याच वनडेत शुबमन गिलचं नशिब निघालं फुटकं! इंग्लंडच्या बाजूने कौल, पण..; अशी आहे प्लेइंग 11

July 14, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक इंग्लंडने जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. खरं तर नाणेफेकीत शुबमन गिलचं नशिब खूपच फुटकं आहे. कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यापासून नाणेफेक अनेकदा गमावली आहे. त्यामुळे नको असलेला निर्णय पदरी पडतो आणि कामगिरी करावी लागते. पण यावेळी नाणेफेक गमावल्यानंतर शुबमन गिलच्या मनासारखं घडलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘खरं तर, आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याच्या विचारात आहोत.’

टी20 सामन्यांनंतर भारताच्या तयारीवर शुबमन गिल म्हणाला की, ‘मला वाटतं की बहुतेक खेळाडू टी20 सामने खेळले आहेत आणि बाकीच्या खेळाडूंना थोडी विश्रांती मिळाली, मी थोडा सराव केला. मी इथे दोन दिवस आधीच आलो, त्यामुळे आम्ही सराव करत होतो. त्यामुळे वातावरण, उत्साह खूपच चांगला आहे.’ 2027 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर मालिकेच्या महत्त्वावर शुबमन गिल म्हणाला की, ही आमच्यासाठी एक महत्त्वाची मालिका आहे, आम्ही भारतात ज्या परिस्थितीत खेळतो त्याच्या तुलनेत, इथे मिळणारी परिस्थिती दक्षिण आफ्रिकेसारखी असेल. त्यामुळे या संदर्भात, आम्ही कोणत्या प्रकारचे वेगवेगळे संयोजन वापरून पाहू शकतो आणि ज्या खेळाडूंना विशेषतः या फॉरमॅटमध्ये जास्त अनुभव नाही, त्यांना खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे हे आमच्यासाठी खूप चांगले असेल.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत शुबमन गिल म्हणाला की, ‘निश्चितच बहुतेक वरिष्ठ खेळाडू परत आले आहेत. आमच्या संघात विराट, रोहित, केएल आणि बुमराह परत आले आहेत. त्यामुळे हा अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. इंग्लंडमध्ये मालिकेसाठी खूप उत्सुक आहे, विशेषतः या मैदानावर माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. त्यामुळे आशा आहे की आम्ही त्यात आणखी भर घालू.’ प्लेइंग इलेव्हनबद्दल शुबमन गिलने सांगितलं की, तर नेहमीच्या खेळाडूंव्यतिरिक्त, आमच्याकडे दुबेच्या रूपात चार वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यानंतर अक्षर आणि वॉशिंग्टन हे दोन फिरकी गोलंदाज आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग, आदिल रशीद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फडणवीस सरकारला आंदोलकांनी घेरलं, आदिवासी विद्यार्थीही मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का?
  • Kamya Punjabi : नवऱ्याने मुलीसमोर असं काय केलं, अभिनेत्रीने थेट घेतला घटस्फोटाचा निर्णय, पोटगी तर…
  • जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार; काय घडतंय?
  • मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज
  • मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in