• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG : इंग्लंडचा हा बॉलर तिलक वर्मा, संजू सॅमसनला झेपतच नाही, दोघे समोर आले की गिऱ्हाईकच बनवतो

July 3, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंडमधील पहिला T20 सामना रोमांचक होईल असं तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटलं होतं. पण पावसाने या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवलं. पावसामुळे भारत-इंग्लंडमधील पहिला T20 सामना ड्रॉ झाला. पहिल्या इनिंगमध्ये भारताने फलंदाजी केली. पण पावसामुळे दुसरा डाव होऊ शकला नाही. सामना पूर्ण झाला नाही. पण भारताच्या दोन स्टार फलंदाजांना या सीरीजमध्ये कोणाचा सामना करताना जास्त काळजी घ्यावी लागेल ते मात्र स्पष्ट झालं. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने घातक गोलंदाजी करताना 4 ओव्हरमध्ये 33 रन्स देऊन 3 विकेट काढले. या मॅचमध्ये साकिब महमूदने भारतीय ओपनर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांची विकेट काढली. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्माचा साकिब महमूदसमोर खूप खराब रेकॉर्ड आहे. हे दोघेही क्रीजवर आल्यानंतर साकिबच्या गोलंदाजीसमोर आत्मसमर्पण करतात असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही.

भारतीय विकेटकिपर-फलंदाज संजू सॅमसनसाठी साकिब महमूदची गोलंदाजी एक कोडं बनलीय, जे तो अजून सोडवू शकलेला नाही. याआधीच्या T20 सामन्यातही महमूदने संजू सॅमसनला 1 रन्सवर तंबूत पाठवलं होतं. खास बाब ही आहे की, T20 मध्ये हे दोन्ही खेळाडू दुसऱ्यांदा आमने-सामने होते. दोन्हीवेळा साकिबनेच संजूला आऊट केलं. संजूने साकिबच्या पाच चेंडूंचा सामना केला. पण एकही धाव न बनवता बाद झाला.

त्याच्यासमोर तिलक वर्मा खूप लाचार वाटतो

सॅमसनपेक्षा पण खराब स्थिती युवा फलंदाज तिलक वर्माची आहे. साकिब महमूदच्या गोलंदाजीसमोर तिलक वर्मा खूप लाचार वाटतो. याआधीच्या T20 सामन्यात तिलक 12 चेंडूत 13 धावांवर खेळत असताना महमूदने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. खास बाब ही आहे की, T20 मध्ये आतापर्यंत तिलक वर्माने साकिब महमूदच्या फक्त तीन चेंडूंचा सामना केला आहे, त्यात फक्त 1 रन्स करुन दोनवेळा आऊट झाला आहे. भारताच्या या दोन स्टार फलंदाजांना इंग्लंडचा हा गोलंदाज झेपतच नाही असं दिसतय.

पहिल्या T20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी 20 ओव्हर्समध्ये 189 धावांचा चांगला स्कोर उभा केला होता. यात श्रेयस अय्यरच्या 68, अभिषेक शर्मा 59 आणि हाणामारीच्या षटकात शिवम दुबेने तुफान फटकेबाजी करत 21 चेंडूत 42 धावा लुटल्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in