• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG : विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी;अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियात संधी!

June 4, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना हा 6 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. तर 13 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघात विराट कोहली याच्या जागी ऋतुराज गायकवाड याचा समावेश केला जाऊ शकतो, असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

विराटच्या जागी ऋतुराजला संधी

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, टीम इंडियात विराट कोहली याच्या जागी ऋतुराज गायकवाड याचा समावेश केला जाऊ शकतो. विराटला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर रहावं लागणार आहे. इंडिया ए टीम काही दिवसांनी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ऋतुराजचा काही दिवसांआधी श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया ए टीममध्ये रियान पराग याच्या जागी समावेश करण्यात आला होता. ऋतुराजला उपकर्णधार म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र आता ऋतुराज अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात असणार असा दावा केला जात आहे. त्यामुळे ऋतुराजच्या जागी इंडिया ए टीममध्ये कुणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विराटला हॅम्स्ट्रिंगचा त्रास असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऋतुराजचं नाव विराटच्या जागेसाठी आघाडीवर आहे. ऋतुराजला संधी मिळाल्यास टीम इंडियाला दुहेरी फायदा होईल.एक म्हणजे फलंदाज मिळेल. दुसरा फायदा म्हणजे ओपनर म्हणून पर्याय मिळेल.

ऋतुराजची एकदिवसीय कारकीर्द

ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत टीम इंडियाचं 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. ऋतुराजने या दरम्यान 28.50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच ऋतुराजने या दरम्यान 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे. ऋतुराजने अखेरचा एकदिवसीय सामना हा डिसेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. ऋतुने त्याच मालिकेत पहिलंवहिलं एकदिवसीय शतक झळकावंल होतं.

ऋतुराजच्या जागी रजत पाटीदारचा समावेश?

दरम्यान ऋतुराजला विराटच्या जागी संधी मिळाल्यास इंडिया ए टीममधील 1 स्थान रिक्त होईल. त्यामुळे त्या जागी रजत पाटीदार याला संधी मिळणार असल्याचं इंडिया एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. रजतने नुकतंच त्याच्या नेतृत्वात आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in