• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND A vs SL A: भारत श्रीलंका यांच्यात दुसरी औपचारिक कसोटी, पहिल्या दिवशी असं घडलं

July 2, 2026 by admin Leave a Comment

भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दुसरा औपचारिक कसोटी सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार ध्रुव जुरेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमवून 288 धावा केल्या. श्रीलंकेचा कर्णधार सहान अराचीने नाबाद 83 धावांची खेळी केली. भारताकडून सारांश जैन आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर गुरनूर ब्रारने एक बळी घेतला. श्रीलंका ‘अ’ संघाने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. सोहन डी लिवेरा 28 धावांची खेळी करून बाद झाला. यश ठाकुरच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कलने झेल पकडला. त्यानंतर पवनथा वीरसिंघे 39 धावांवर असताना गुरनूर ब्रारने त्याला तंबूत धाडलं.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नुवानिंदू फर्नांडोने सारांश जैनच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी 44 धावा केल्या. तीन विकेट पडल्यानंतर अशेन बंदारा आणि सहान अराचीने चौथ्या विकेटसाठी99 धावांची भागीदारी केली. अशेन बंदारा 34 धावा करून यश ठाकुरच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. दिवसअखेरीस, अराचीने नाबाद 83 धावा आणि गुणसेकराने 6 धावांवर खेळत आहेत.

पहिल्या कसोटीत उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या अकीब नबी दारला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकही बळी घेता आला नाही. नबीने चार निर्धाव षटकांसह 15 षटके टाकली आणि पहिल्या दिवशी 50 धावा दिल्या. सारांश जैनने 24 षटकांत 77 धावा देऊन दोन बळी घेतले, तर झीशान अन्सारीला 16 षटकांत 64 धावा देऊन एकही बळी घेता आला नाही. शेख रशीदने एक षटक टाकले आणि 10 धावा दिल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका अ (प्लेइंग इलेव्हन): पवनथा वीरसिंघे, सोहन डी लिवेरा, नुवानिडू फर्नांडो, अशेन बंदारा, सहान अरचिगे (कर्णधार), अंजला बंडारा (विकेटकीपर), चमिका गुणसेकरा, दिलम सुदेरा, केशरा नुवांथा, दुलाज समुदिथा, असांका मनोज.

भारत अ (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, अमन मोखाडे, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल (कर्णधार/विकेटकीपर), शेख रशीद, सरांश जैन, झीशान अन्सारी, औकीब नबी दार, यश ठाकूर, गुरनूर ब्रार

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in