• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडने फक्त शतकच झळकवलं नाही, तर विराट कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला

June 10, 2026 by admin Leave a Comment


श्रीलंका दौऱ्यावर भारतीय-अ संघाने तिरंगी वनडे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. या विजयाचा नायक ठरला ऋतुराज गायकवाड. टीमचा उपकर्णधार असलेल्या ऋतुराजने शानदार शतक झळकावलं. या शतकासह तो लिस्ट-ए वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज बनला आहे. (Photo: PTI)

दाम्बुला येथे श्रीलंका ए विरुद्ध हा सामना झाला. ऋतुराज गायकवाड 114 चेंडूत 101 धावांची दमदार इनिंग खेळला. टीमला त्याने अडचणीतून बाहेर काढलं. ही इनिंग ऋतुराजसाठी सुद्धा खास आहे, कारण तो लिस्ट ए करिअरमधला 100 वा सामना खेळत होता. (Photo: Sri Lanka Cricket)

100 व्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने या फॉर्मेटमध्ये लिस्ट ए मध्ये आपलं 21 वं शतक झळकावलं. या शतकासह ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॅटिंग एवरेजचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. (Photo: Sri Lanka Cricket)

लिस्ट – ए क्रिकेटमध्ये कमीत कमी 50 इनिंग खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये गायकवाडची बॅटिंग सरासरी 59.3 झाली आहे. क्रिकेट विश्वातील लिस्ट ए मधील ही सर्वाधिक सरासरी आहे. या बाबतीत ऋतुराज गायकवाडने विराट कोहली (57.91) आणि ऑस्ट्रेलियाई दिग्गज मायकल बेवन (57.85) यांना मागे टाकलं. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 100 लिस्ट ए सामन्यात 96 इनिंग्समध्ये 5,161 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 21 शतकं आणि 19 अर्धशतकं झळकावली. एक द्विशतकही नाबाद 220 या इनिंग्समध्ये आहे.(Photo: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
  • आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट
  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in