• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Rain Alert : मुसळधार पाऊस कहर करणार, महाराष्ट्रासह या राज्यांना अलर्ट जारी

August 3, 2026 by admin Leave a Comment


देशाच्या विविध भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 4 ऑगस्ट रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय राहणार आहे. ईशान्य भारतात अतिवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेशातही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांनाही पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.

पूर्व भारतातही पावसाचा जोर कायम राहणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून बिहारमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजस्थानात काय परिस्थिती?

गेल्या 24 तासांत राजस्थानच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी, तर पश्चिम भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. पाली जिल्ह्यातील जैतारण येथे सर्वाधिक 161 मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारपासून जोधपूर, उदयपूर आणि कोटा विभागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 3 ते 5 ऑगस्टदरम्यान बीकानेर, शेखावाटी, जयपूर आणि भरतपूर विभागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता आहे, मध्य महाराष्ट्रातील काही भागात 4 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर भारतातही पावसाची शक्यता

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील अनेक भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दक्षिण भारतात कसे असेल हवामान?

IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ, किनारी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळ आणि किनारी भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. तर तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in