• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope Today 19th August 2026 : रखडलेली कामे मार्गी लागतील, नव्या संधी मिळतील ; वाचा तुमच्या राशीत आज काय ?

August 19, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 19th August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या संधी आणि लाभाचे मार्ग घेऊन येऊ शकतो. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि सुख-सुविधांमध्ये वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील. जुन्या मित्राची भेट झाल्यास जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सासरच्या मंडळींकडून एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. तिची नाराजी तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभर तुमचा मूड आनंदी राहील. घरात अचानक एखादी चांगली बातमी किंवा सुखद सरप्राइज मिळू शकते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. लहान मुलांच्या आरोग्याकडे मात्र विशेष लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. भाऊ-बहिणींसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज काहीतरी नवीन करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न कराल. जोडीदाराकडून मिळणारा आदर आणि समजूतदारपणा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. जुनी रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून घाईने निर्णय घेऊ नका. शक्यतो कर्ज घेणे टाळा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज तुम्हाला अनेक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. तुमच्या कला किंवा कौशल्यात चांगली प्रगती दिसून येईल. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. मात्र, जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहा. वडिलांचे मार्गदर्शन एखादी मोठी अडचण दूर करण्यात उपयोगी ठरेल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या मनःस्थितीवर दिसून येईल. राजकारण, प्रशासन किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस विशेष लाभदायक ठरू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो, त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळा. जोखमीची कामे टाळणे हिताचे ठरेल. रखडलेली काम मार्गी लागतील, आज कायदेशीर बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य तुमचा उत्साह वाढवेल. मात्र, मुलांच्या आरोग्याबाबत थोडी चिंता वाटू शकते. शिक्षण आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी दिवस चांगला आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घराची दुरुस्ती, सजावट किंवा काही नवीन बदल करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

व्यवसायातील काही गोष्टी आज थोड्या गुंतागुंतीच्या वाटू शकतात. मात्र, कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. मुलांसोबत बाहेर फिरण्याची संधी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. तुमच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आता यश मिळू लागेल आणि प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून येतील.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आज उत्पन्न वाढवण्याच्या नव्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. अनेक कामे अपेक्षेपेक्षा सहज पूर्ण होतील. सुख-सुविधांमध्ये वाढ झाल्याने मन आनंदी राहील. वैवाहिक जीवनातील जुना तणाव दूर होऊन नात्यात पुन्हा प्रेम आणि गोडवा निर्माण होऊ शकतो. मात्र, बोलताना शब्द जपून वापरा आणि रागाच्या भरात कोणतेही वक्तव्य करू नका. इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना काळजी घ्या.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस आनंददायी आणि समाधान देणारा असेल. कुटुंबाचा पाठिंबा आणि आई-वडिलांचे आशीर्वाद तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यास मदत करतील. भाऊ-बहिणींचा सल्ला एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात फायदेशीर ठरेल. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने मनाला समाधान मिळेल. मात्र, अत्यावश्यक नसल्यास आजचा प्रवास पुढे ढकलणे चांगले राहील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देण्याचा दिवस आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि ओळख वाढेल. आईच्या भावना समजून घ्या आणि तिच्या बोलण्याचा आदर करा. आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. काहीतरी नवीन करण्याची इच्छा तुम्हाला प्रेरणा देईल आणि ध्येयाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलाल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही कुशलतेने पार पाडाल. तुमची सूज्ञता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येक कामात उपयोगी ठरेल. आर्थिक आणि कौटुंबिक सुख-समृद्धीत वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून पाहत असलेले नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायातील एखादी महत्त्वाची रखडलेली डील अंतिम टप्प्यात येईल. आईच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज तुमचे मन शांत आणि समाधानी राहील. धार्मिक व आध्यात्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल. जोडीदारासोबत प्रेमाचे आणि रोमँटिक क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. कुटुंबात एखाद्या छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो; मात्र शांतपणे परिस्थिती हाताळल्यास वातावरण पुन्हा आनंदी करता येईल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in