• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hormuz Strait : इराणवर डाव उलटला, त्यांच्या 8 जहाजांनी हॉर्मुजच्या लाटा तर पार केल्या पण..अमेरिकेकडून खतरनाक गेम

April 15, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करण्याची घोषणा केली होती. खासकरुन इराणसाठी ही नाकेबंदी करण्यात आली. चीनचं नाक दाबणं हा त्यामागे उद्देश होता. आखाताच्या समुद्रात अमेरिकेने इराणला अशा पद्धतीने घेरलय की, ती घेराबंदी तोडणं अशक्य आहे. इराणच्या 8 तेल टँकर्सनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या लाटा तर पार केल्या. पण राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेली लक्ष्मण रेषा ते ओलांडू शकले नाहीत. अमेरिकन नौदलाने इराणच्या सर्व 8 जहाजांना भर समुद्रात घेरलय. त्यांची वाट अडवून धरली आहे. इराणच्या तेल निर्यातीचा मार्ग बंद करुन त्यांना चर्चेसाठी भाग पाडणं हा अमेरिकेचा उद्देश आहे.

आखाताच्या समुद्रात अमेरिकेने इराण विरुद्ध नाकाबंदी कठोरतेने लागू केलीय. WSJ च्या रिपोर्टनुसार नाकाबंदी सुरु झाल्यापासून आतापर्यंत इराणच्या 8 तेल टँकर्सना अमेरिकन नौदलाने भर समुद्रात रोखून धरलं आहे. ही जहाजं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पार करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यांची वाट अडवून त्यांना परत फिरायला सांगितलं आहे. जहाजांवर लक्ष ठेवणं हीच सध्याची रणनिती आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने एपीने म्हटलं आहे. एखादं जहाज इराणच्या बंदरातून निघताच अमेरिकी सुरक्षा पथकं या जहाजाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. ही जहाजं ओमानच्या खाडीच्या दिशेने वळताच त्यांचा मार्ग अडवून त्यांना परत पाठवलं जातं.

जहाजांच्या येण्या-जाण्यावर अत्यंत बारीक लक्ष

अमेरिकी सेंट्रल कमांडचे कमांडर एडमिरल ब्रॅड कूपर यांनी म्हटलय की, मिडिल ईस्टच्या समुद्रावर आता फक्त अमेरिकेचं राज्य आहे. कूपर यांच्यानुसार, नाकाबंदी लागू होताच 36 तासांच्या आत इराणचा समुद्रातून होणारा व्यापार बंद करण्यात आला आहे. इराणची जवळपास 90 टक्के अर्थव्यवस्था समुद्रीत आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्भर आहे असाही कूपर यांचा दावा आहे. याचा थेट परिणाम इराणच्या आर्थिक घडामोडींवर होईल. इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यात कुठलीही नरमी नाही. इराणचा अणवस्त्र बॉम्ब आम्हाला मान्यच नाही असं ट्रम्प म्हणाले. सध्या अमेरिकेने हॉर्मुज आणि ओमानच्या खाडीतील घडामोडींवर लक्ष केंद्रीत केलय. जहाजांच्या येण्या-जाण्यावर अत्यंत बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘ही’ 3 झाडं तुमच्या घरात कधीच लावू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
  • अमरावतीतील लिंगपिसाटाच्या घरावर बुलडोझर फिरतो, मग भोंदू खरातच्या फार्महाऊसवर का नाही?; महिला रणरागिणींचा सवाल
  • स्वयंपाकघरापासून ते कपडे धुण्यापर्यंत… कॉर्नस्टार्चचे महत्त्वाचे उपयोग घ्या जाणून
  • Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार स्ट्रीम?
  • Women Reservation: महिला आरक्षण हे तर षडयंत्र, काँग्रेस महिला खासदाराच्या आरोपाने खळबळ, नेमका आरोप काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in