• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत, भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटला

August 16, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि चीन आमनेसामने आले होते. हा सामन्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन गोल झाले आणि सामना 2-2 बरोबरीत सुटला. या सामन्यात पहिल्या दोन सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखवला. भारताची स्टार फॉरवर्ड नवनीत कौरने सामन्यात उत्कृष्ट मैदानी गोल करत आठव्या मिनिटाला भारताला 1-0 ने महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. भारतीय खेळाडू सर्कलच्या आत चिनी खेळाडूला पुश दिल्याने पंचांनी चीनच्या बाजूने निकाल दिला. भारताने यावर तात्काळ रिव्ह्यू घेतला. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. चीनच्या झांग यिंगने पेनल्टी स्ट्रोकवर अप्रतिम फटका मारला आणि गोल केला. त्यामुळे 1-1 अशी बरोबरी आली. त्यामुळे भारतीय संघावर दडपण वाढलं.

दुसऱ्या क्वॉर्टरच्या 25व्या मिनिटाला भारताकडून दुसरा गोल दीपिकाने केला. दीपिकाचा जोरदार ड्रॅग-फ्लिक एका चिनी बचावपटूच्या खांद्याला लागून दिशा बदलून गोलरक्षकाच्या डोक्यावरून नेटमध्ये गेला.दीपिकाने निर्णायक क्षणी पेनल्टी कॉर्नरचे गोल केल्याने भारताला पुन्हा आघाडी मिळाली. मध्यंतरापर्यंत भारताने 2-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमधील तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये चीनने आक्रमक खेळ दाखवला. तिसऱ्या क्वॉर्टरलच्या सुरुवातीलाच चीनने आक्रमक भूमिका घेत दोन शॉट्स गोलपोस्टच्या दिशेने मारले आणि भारतावर दबाव आणला. त्याचा परिणाम 39व्या मिनिटाला दिसून आला. मा निंगने चीनचा पहिला पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये रूपांतरित करून भारताविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर कोणत्याही संघाला आघाडी घेता आली नाही. भारतीय संघाचा पुढील सामना 18 ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

भारतीय महिला हॉकी संघ

  • कर्णधार: सलीमा टेटे
  • गोलरक्षक: सविता पुनिया, बिचू देवी खारीबाम.
  • बचावपटू: इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथांतलुआंगी, ज्योती, शिल्पी डबास.
  • मिडफिल्डर : निक्की प्रधान, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो, सलीमा टेटे, नेहा, दीपिका सोरेंग.
  • फॉरवर्ड : लालरेमसियामी, ऋतुजा दादासो पिसाळ, नवनीत कौर, दीपिका सेहरावत, इशिका, बलजीत कौर, ब्यूटी डुंगडुंग

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in