• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hockey WC 2026: भारत पाकिस्तान सामना सुरू असताना 19व्या मिनिटाला घडलं असं काही

August 19, 2026 by admin Leave a Comment

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. खरं तर या सामन्यावर पूर्णपणे भारताची पकड राहिली. पहिल्या क्वॉर्टरपासून चौथ्या क्वॉर्टरपर्यंत भारताची सरशी राहिली. भारताने हा सामना 5-3 ने जिंकला. या सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारताने पहिला गोल मारत आघाडी घेतली. त्यामुळे पाकिस्तानवरील दडपण वाढलं. हे दडपण शेवटपर्यंत कायम राहिलं. त्यात सातव्या मिनिटाला भारताने आणखी गोल मारत 2-0 अशी स्थिती आणली. त्यामुळे ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानवर होतं. पाकिस्तानने ही आघाडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. पहिल्या क्वॉर्टरपर्यंत 2-0 अशी स्थिती राहिली. त्यामुळे दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये पाकिस्तानने आक्रमक खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान 19व्या मिनिटाला एक आक्रित प्रकार घडला आणि सामना थांबवावा लागला.

नेमकं मैदानात काय घडलं?

भारताने मिळवलेली आघाडी कमी करण्याच्या हेतूने पाकिस्तानच्या अबू महमूदची जोरदार चढाई सुरू होती. असं असताना त्याने पूर्ण जोर लावून चेंडूवर प्रहार केला. हा चेंडू गोळीच्या वेगाने गोलच्या दिशेने जात होता. पण भारताच्या अमित रोहिदासने जीव ओतून धावा घेतली. शॉट ब्लॉक करण्यासाठी आपली हॉकी स्टिक अबू महमूदच्या समोर आडवी घातली. त्यामुळे अबू महमूदचा थेट गोल मारण्याचा प्रयत्न फसला. पण दुर्दैवाने चेंडू त्याच्या स्टिकच्या वरच्या कडेला लागून हवेत उडाला आणि थेट प्रेक्षकांमध्ये गेला. गॅलरीत बसलेल्या चाहत्याला काही कळायच्या त्याला जोरदार लागला. चेंडू लागल्यानंतर हॉकी चाहता वेदनेने कळवला. त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला.

19′ – Doctor in the stand!

Play has been halted after a spectator in the stands is struck by the ball. Medical personnel are attending to them as we await the resumption of play. We hope they’re okay. 🙏

🇮🇳 2-0 🇵🇰#HockeyIndia #HWC2026 #INDvsPAK #IndiaKaGame #DusSaalKaDabdaba pic.twitter.com/rwUBoCaRGg

— Hockey India (@TheHockeyIndia) August 19, 2026

पंचांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ शिटी वाजवली आणि सामना थांबवला. अचानक काय झालं म्हणून मैदानात शांतता पसरली. वैद्यकीय पथक प्रथमोपचार पेटी घेऊन तात्काळ त्याच्याकडे पोहोचली. अमित रोहिदासच्या या बचावामुळे भारतावरील गोलचे संकट टळले खरे, पण मैदानाबाहेरील त्या अनपेक्षित अपघातामुळे काही काळ सगळ्यांचाच श्वास रोखला गेला होता. पण फार काही झालं नसल्याचं कळल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला 5-3 ने लोळवत शेवट केला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in