• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda-Sunita Ahuja : गोविंदा-सुनीतामध्ये पुन्हा सर्व काही सुरळीत ? घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

August 19, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील फेमस जोडपं अभिनेता गोविंदा (Govinda) आणि सुनीता अहुजा हे जोडपं पुन्हा चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे सुनिता अहुजा यांनी गोविंद विरोधात दाखल केलेला घटस्फोटाचा खटला मागे घेतल्याचे वृत्त समोर आलं आहे. गोविंदा यांच्या मॅनेजरनेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घडामोडीमुळे या दाम्पत्याच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.  यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांच्या त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यातच आज सकाळी सुनीता अहुजा या त्यांचा मुलगा यशवर्धन याच्यासोबत मुंबईतील फॅमिली कोर्टात पोहोचताच, अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांच्या नात्यात पुन्हा काही बिनसलं, काही वाद निर्माण झाला का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र आता सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका कायदेशीररित्या मागे घेतल्याचं समोर आल्याने चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आधी केले होते एकमेकांवर आरोप

गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा यांच्यात वाद चालू आहे. अगोदर या दाम्पत्यात सर्वकाही आलबेल नाही, असं सांगितलं जात होतं. त्यानंतर हे दाम्पत्य लवकरच घटस्फोट घेणार आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे दोघांनीही उघडपणे एकमेकांवर सडकून टीका करायला सुरुवात केली होती. आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले. सुनिताने मला बळजबरी अनेक रिॲलिटी शोमध्ये बोलावलं, असा आरोप गोविंदाने केला होता. तर सुनिता यांनीही गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवरून संताप व्यक्त केला होता. सुनिता यांनी रुमर्ड गर्लफ्रेंड कोमल राणी यांना डिवचले होते. म्हणूनच हे कपल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

मॅनेजरने दिला दुजोरा

गोविंदा यांचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका कायदेशीररित्या मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं “ त्यांना काय झालं होतं हे मला माहीत नाही, पण आता त्यांनी ही याचिका अधिकृतपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापूर्वी याचिका दाखल केली होती, मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता त्यांनी कायदेशीररित्या केस मागे घेतली आहे” असं सिन्हा यांनी नमूद केलं.

डिसेंबर 2024 ला दाखल केला होता अर्ज

रिपोर्ट्सनुसार, सुनीता अहुजा यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी गोविंदाविरोधात वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. विश्वासघात, क्रूरता आणि वेगळं राहणं या कारणांचा यामध्ये कथितरित्या उल्लेख करण्यात आला होता. मात्र आता गोविंदाच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, सुनीता यांनी हा अर्ज मागे घेतला आहे. आता दोघांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे आणि शांततेचे दिवस येऊ शकतात, अशी आशा शशी सिन्हा यांनी व्यक्त केली.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in