• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda : प्रेमावरील विश्वास डळमळीत.. गोविंदा आणि सुनीताच्या कॉन्ट्रोव्हर्सीदरम्यान सुनेची क्रिप्टीक पोस्ट, चर्चांना उधाण

August 17, 2026 by admin Leave a Comment


सुपरस्टार गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहूजा यांच्या वैवाहिक जीवनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांमध्येही काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत असून गोविंदा आणि सुनिता एकमेकांवर सातत्याने टिप्पणी करताना, टोमणे मारताना दिसतात. त्या दोघांकडूनही एकमेकांबद्दल केली जाणारी वक्तव्य देखील चर्चेचा विषय ठरलीत. मात्र आता याचदरम्यान गोविंदा याचा भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहने केलेल्या एका कमेंटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न आणि विश्वासघाताबद्दल निराशा व्यक्त केली. तिच्या क्रिप्टीक पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कश्मीरा शाहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आकाशात हृदयाच्या आकाराचा धुरकट ढग असलेला फोटो शेअर केला. मात्र फोटोपेक्षा त्यासोबत लिहिलेल्या तिच्या शब्दांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. कश्मीराने थेट खऱ्या प्रेमावर प्रश्न उपस्थित केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

खरं प्रेम अजूनही अस्तित्वात आहे का?

या फोटोसोबत काश्मिराने एक पोस्टही लिहीली, “हेच खरं प्रेम असतं का? खरंच असं प्रेम अस्तित्वात आहे का? एखादी व्यक्ती कोणावर इतकं प्रेम करू शकते का की त्याच्यासाठी पैसे खर्च करेल आणि त्याला स्पेशल असल्याची जाणीव करून देईल? असं प्रेम कुठे मिळतं? आणि तो माणूस कोण आहे?” असं काश्मिराने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र एवढंच नव्हे तर, पुढे तिने लग्नं तुटताना आणि लोक एकमेकांना धोका देताना पाहून आपला प्रेमावरील विश्वास डळमळीत झाल्याचंही म्हटलं. या पोस्टद्वारे काश्मीराचा रोख नेमका कोणाकडे, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सुनीता आहूजना केले होते अफेअरचे आरोप

खरंतर, गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या काळात कश्मीरा शाहची ही पोस्ट समोर आली आहे. सुनीता आहूजाने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये लग्न आणि विश्वासघाताबद्दल काही स्पष्ट वक्तव्यं केली होती. तसेच गोविंदाच्या कथित अफेअर्सबाबतही तिने अनेक दावे केले होते. त्यामुळे अभिनेत्याची प्रतिमा सार्वजनिकपणे खराब होत असल्याचेही चर्चा जात आहे.

काही दिवसांपूर्वी पापाराझींशी बोलताना सुनीता यांनी गोविंदासोबत काम करणाऱ्या एका तरुण अभिनेत्रीचा उल्लेख करत त्याला तिचा ‘शुगर डॅडी’ म्हटलं होतं. मात्र तिच्या या वक्तव्याने मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली.

गोविंदानेही दिलं होतं स्पष्टीकरण

सुनीता हिच्या वक्तव्यांनंतर गोविंदानेही व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती. सुनीता आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. गोविदांने सुनीत हिला शिवीगाळ थांबवण्याचा आणि आपल्या भाषेवर थोडं नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता. तसेच केवळ एखादी तरुण अभिनेत्री आपल्यासोबत दिसली म्हणून आपलं अफेअर आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचेही गोविंदाने बोलून दाखवलं होतं.

आता कश्मीरा शाहच्या ‘खरं प्रेम कुठे मिळतं?’ या पोस्टमुळे या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक वेगळा ट्विस्ट मिळाला आहे. तिची ही पोस्ट गोविंदा-सुनीता यांच्या वादावर अप्रत्यक्ष टिपण्णी आहे की केवळ तिचे वैयक्तिक मत, याबाबत मात्र कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in