• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : 1947 साली 10 रुपयात तब्बल इतकं सोनं, त्याच सोन्याचा आजचा भाव किती? थक्क करणारा आकडा!

August 15, 2026 by admin Leave a Comment


Gold Rate 1947 vs 2026 : आज आपला देश ८० वा स्वातंत्र्य दिन साजारा करत आहे. या वर्षात भारताने अनेक क्षेत्रात आपणे नाव मोठे केले आणि चंद्रावर यान उतरवले. या वर्षात जगात महागाई प्रचंड वाढली आहे. एक चहा पासून ते १० ग्रॅम गोल्डचे दर प्रचंड वाढले आहेत. आजच्या काळात १० रुपयात एक कप चहा येतो, परंतू स्वांतत्र्याच्या काळात तुम्ही दहा रुपयात सोने देखील खरेदी करु शकत होता. चला तर आज लाखो रुपयांना मिळणारे सोने स्वातंत्र्याच्या काळात म्हणजे १९४७ मध्ये किती रुपयांना मिळत होते.

१९४७ मध्ये 10 रुपयांना इतके मिळायचं सोनं ?

आज देशात सोने १,५३,०४० रुपये प्रति १० ग्रॅम मिळत आहे. परंतू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार स्वातंत्र्य मिळाले तेव्हा म्हणजे १९४७ मध्ये सोने ८८.६२ रुपये प्रति १० ग्रॅम विकले जात होते. यानुसार तुम्ही त्या काळात १० रुपयात १ ग्रॅमहून जास्त सोने घरी आणू शकत होता. आजच्या काळात एक ग्रॅम सोने खरेदी करण्यास गेला तर १५,००० रुपयाहून जास्त पैसे खरेदी करावे लागतात. याचा अर्थ हा नाही की सोने त्यावेळी स्वस्त विकले जात होते. त्याकाळात १० रुपयांची किंमत खूप जास्त होती. त्याकाळी एक लिटर दूधही १२ पैशात येत होते.

आजचा सोने चांदीचा भाव काय ?

भारतीय सराफ बाजारात सोने – चांदीचा भाव आज स्थिर आहे. आज २४ कॅरेट गोल्ड १, ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम विकले जात आहे. तर चांदीची किंमत २,४०,००० प्रति किलोग्रॅमवर पोहचली आहे.

येथे पाहा साल १९४७ ते २०२६ दरम्यान वस्तूंच्या दरातील तफावत पहा…

वस्तू 1947 चे दर 2026 चे दर
सोने (10 ग्रॅम) 88.62 रुपये (10 ग्रॅम ) 1,53,040 रुपये
पेट्रोल ( एक लीटर ) 27 पैसे 102.12 रुपये
तांदुळ ( प्रति किलो ) 12 पैसे 44.89 रुपये
साखर ( प्रति किलो ) 40 पैसे 41.50 रुपये
बटाटा ( प्रति किलो ) 25 पैसे 22 रुपये
दूध ( एक लीटर ) 12 पैसे 77 रुपये

काय म्हणतात एक्सपर्ट?

एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये जेष्ठ विश्लेषक असलेले सौमिल गांधी यांच्या मते कमजोर जागतिक संकेता दरम्यान शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. अपेक्षा पेक्षा कमी अमेरिकन उत्पादक मुल्य आकड्यानंतरही सोन्याची किंमत कमतरता आली. त्यांनी सांगितले की सोन्यातील ही घसरण अलिकडे झालेल्या भाव वाढीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेल्या नफेखोरी मुळे आली आहे. या शिवाय गुंतवणूकदारांनी मोठ्या दरात नवीन सौदे करताना सावध रहावे असेही या तज्ज्ञाने म्हटले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in